
रत्नागिरी (उमेश मोहिते)
जिल्हा परिषद मराठी शाळा चिखली बौद्धवाडी तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी या शाळेमध्ये स्मृतीशेष मयूर आत्माराम मोहिते यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त त्यांच्या मोहिते परिवाराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील शांताराम रोंगा मोहिते, गणपत गौरू मोहिते,आत्माराम रोंगा मोहिते, मनोहर रोंगा मोहिते, प्रतिष शांताराम मोहिते सूरज राजाराम मोहिते, अक्षय मनोहर मोहिते, शशिकांत गणपत मोहिते, अमर आत्माराम मोहिते हे त्यांच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या उपशिक्षिका सारिका घुगे यांनी उपस्थितांचे स्वागत करून केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन कदम यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना म्हटले की, संपूर्ण मोहिते परिवाराचे शिक्षण क्षेत्रात किती मोठे योगदान आहे व आज या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यामागची पार्श्वभूमी उपस्थितांना समजावून सांगितली. ही आपली शाळा उभी करण्यासाठी आमच्या चिखली बौद्धवाडी व पंडव वाडीतील शैक्षणिक क्रांती घडविली त्याचे यशस्वी नेतृत्व केले रोगा उमाजी मोहिते यांनी. त्यांच्या प्रेरणेतून आपली बौद्धवाडी शाळा खऱ्या अर्थाने उदयास आली. त्यांच्याच वारसदारांनी आपल्या वडिलांचा व आपल्या आजोबांचा वारसा जपून आपल्या शाळेच्या विकासासाठी हा मोहिते परिवार नेहमीच अग्रेसर असतो. स्मृतीशेष मयूर आत्माराम मोहिते हा विद्यार्थी दशेत असताना आपल्यातून निघून गेला. त्याच्या मृत्यू नंतर मोहिते परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र हे दुःख बाजूला ठेवून आपल्या भावाच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी त्यांचे मोठे बंधू अमर आणि सर्व मोहिते परिवाराने आपल्या मुलाचे आपल्या भावाचे प्रतिबिंब शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये पाहत प्रति वर्षी शाळेच्या मुलांना मयूरच्या नावाने शैक्षणिक साहित्य देण्याचा संकल्प केला. आमच्या शाळेच्या पालकांनी शैक्षणिक साहित्य वर्षभरात विकत घेऊ नये अशी भरघोस स्वरूपाचे साहित्य आज त्यांनी दिले. जेणेकरून आमच्या शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला कोणतेही शैक्षणिक साहित्य कमी पडू नये. हा हेतू ठेवून हे शैक्षणिक साहित्य मोहिते परिवाराने दिले. दरम्यान पुढील दोन वर्ष मुलांना कोणतेही शैक्षणिक साहित्य घेण्याची गरज राहणार नाही एवढे साहित्य प्रत्येक विद्यार्थ्यांना आज दिले.तसेच अश्या प्रकारचे शैक्षणिक साहित्य वर्षानुवर्षे पुरविण्यात येईल असा शब्द कुटुंबातील सदस्यांनी दिला.
हेही वाचा : कृत्रिम तलावाच्या विरोधात अष्टविनायक चौक परिसरातील नागरिकांमध्ये वाढता रोष
हा कार्यक्रम ग्रामपंचायत चिखलीच्या विद्यमान सरपंच मैथिली कानाल यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी चिखली ग्राम पंचायतीच्या उपसरपंच ममता साळुंके, ग्रामपंचायत सदस्य शिवानी लाखन, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष दत्ताराम पंडव, चिखली बौद्धजन उत्कर्ष मंडळाचे सल्लागार धर्मदास मोहिते, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संस्कृती ओकटे, व्यवस्थापन समितीचे शिक्षण प्रेमी सदस्य वैभव मोहिते, पंडव वाडीचे ग्रामस्थ तुकाराम पंडव, रामदास मयेकर, प्रियांका साळुंखे, तसेच विकास मोहिते, राजा पवार,अनिकेत मोहिते, निलेश बल्लाळ, सचिन मोहिते, रेणू लाखन, तेजस बल्लाळ व बहुसंख्य माता पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका पूनम पाटील यांनी उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले.