
मुंबईत गणेशोत्सवाची सुरवात होते ती लालबागच्या राजाच्या दर्शनाने. गणेशोत्सवच्या पूर्व लालबागच्या राजाचं पारंपारक फोटो सेशन करण्यात येतं. गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या दर्शनाला २४ तास अफाट गर्दी असते. त्यामुळे मिडीया प्रतिनीधींना फोटो शूट करण्यासाठी आज स्पेशल फोटो शूट मंडळाकडून नियोजीत करण्यात आले आहे.
यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरूपती बालाजीच्या राज मुकुटात बसवण्यात आला आहे. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबाच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकरांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाची सुवर्ण पाऊलं ते सुवर्ण राज मुकुट असा राजेशाही थाट आपल्याला लालबागच्या राजाचा पहायला मिळतोय.
यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल ५० फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचं हे फोटो सेशनसाठी होणारं पहिलं दर्शन लेझर लाईट्समुळे आणखीनच विलोभनीय झालंय