मनोरंजन

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटातील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित

संगीतकार हिमेश रेशमिया मराठीत दाखल; सुबोध भावेचा लक्षवेधी लुक

मुंबई : 

शीर्षकापासून चर्चेत असलेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटातील एका मागोमाग एक वैशिष्ट्ये उलगडत आहेत. एका वेगळ्या आशय आणि विषयावर आधारलेला हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेक्षकांसाठी काहीतरी नावीन्यपूर्ण घेऊन आला असल्याची जाणीव चित्रपटाची झलक पाहिल्यावर मिळते. या चित्रपटातील ‘नाच मोरा…’ हे पहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज असलेले हे गाणे प्रथमदर्शनी प्रेक्षकांचा कौल मिळवण्यात यशस्वी होणार असल्याची खात्री निर्मात्यांना आहे.

श्रेय पिक्चर कंपनीची निर्मिती असलेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाच्या निर्मात्या नम्रता सिन्हा आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माते विनय सिन्हा यांची कन्या असलेल्या नम्रता यांनी आजवर अनेक लोकप्रिय टीव्ही मालिका आणि वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाद्वारे नम्रता सिन्हा मराठी सिनेसृष्टीत दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत हिंदीत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आलोक जैन यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. ‘सकाळ तर होऊ द्या’मधील सुबोध भावेचा हटके लूकही रिव्हील करण्यात आला आहे. लांब केस, वाढलेली दाढी, शर्ट-पँट अशा लुकमधील सुबोध या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. सुबोधचा असा लुक का आहे? ते प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजणार आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’मधील ‘नाच मोरा नाच…’ हे पाहिले गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश मधील नयनरम्य लोकेशनवर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात मानसी नाईकच्या नृत्याचा नजराणा पाहायला मिळणार आहे. गुलाबी साडीतील मानसीने या गाण्यात धरलेला ठेका तरुणाईसोबतच महाराष्ट्रातील तमाम रसिकांना ताल धरायला लावणारा आहे. सुबोध-मानसीच्या केमिस्ट्रीची झलकही गाण्यात पाहायला मिळते. बॅालीब्रदर्सच्या फिरोझ खान यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. अभिषेक खणकरने लिहिलेले हे गाणे गायक-संगीतकार रोहित राऊतने Singer Name यांच्या सुमधुर आवाजात संगीतबद्ध केले आहे.

हेही वाचा : ‘लालबागच्या राजा‘च्या दरबारी करणार अवयवदानाबाबत जागरूकता

आजवर अनेक बहारदार हिंदी गीतांना सुमधूर संगीत देणारे संगीतकार हिमेश रेशमिया या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत दाखल झाले आहेत. ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटासाठी काम करण्याचा अनुभव त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, मी एक धमाका घेऊन आलोय तुमच्यासाठी… तयार आहात? ‘सकाळ तर होऊ द्या’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘नाच मोरा…’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची प्रस्तुती माझ्या स्वत:च्य हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबल अंतर्गत करण्यात आली आहे. हे गाणे ऐकल्यावर तुमचे पाय नक्कीच थिरकायला लागतील. त्यामुळे थोडे क्रेझी व्हा. माझ्या पहिल्याच मराठी चित्रपटाच्या गाण्याला तुम्ही सगळे खूप सारं प्रेम द्याल याची मला खात्री आहे. या चित्रपटाबाबत खूप उत्सुक असल्याची भावनाही हिमेश रेशमिया यांनी व्यक्त केली आहे. १० ऑक्टोबरला हा चित्रपट पाहायला येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ओंकार बर्वे आणि अंकुश मरोडे यांनी या चित्रपटासाठी संवादलेखन केले असून, छायांकन सुनील पटेल यांनी केले आहे. सिनेपोलीस या चित्रपटाचे वितरण करणार आहे. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *