
मुलुंड (उमेश मोहिते) :
इंटरनॅशनल इंडो – रियू कराटे डू फेडरेशन (INTERNATIONAL INDO – RYU KARATE -DO FEDERATION) आयोजित ‘स्वाभिमान भारत कप” १९वी इन्व्हिटेशनल ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेचे आयोजन प्रियंदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कालिदास नाट्यगृह संकुल, मुलुंड येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आकांक्षा विक्रम सोनवणे यांनी पहिल्या फेरीत ‘कुमिते’ मध्ये “सुवर्ण पदक” आणि काता मध्ये “कांस्य पदक” आणि अंतिम फेरीत उपविजेता पद पटकावून “१० ग्रॅम चांदीचं बिस्कीट” आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशिक्षक इर्शाद शेख आणि सोनल यांचे कराटेसाठी विशेष मार्गदर्शन मिळाले.
आकांक्षा सध्या विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात, वाणिज्य शाखेत अकरावीत शिकत आहे. लहानपणापासूनच तिला क्रीडा क्षेत्राची आवड होती. इयत्ता दुसरीत असतांनाच तायक्वांडोमध्ये (Taekwondo ) प्रवेश घेतला. नंतर पाचवीत असताना मार्शल आर्टस् मध्ये प्रवेश घेतला. केजी ते १०वी पर्यंत होलीफॅमीली हायस्कूल, चेंबूर येथे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना देखील हाय जंप (High Jump), लाँग जंप (Long Jump), मेडिसिन बॉल थ्रो ( Medicine Ball Throw ), धावणे ( Running ), फूट बॉल ( Foot Ball ) अश्या विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस मिळवली. दहावीमध्ये असताना “बेस्ट ॲथलिट इन गर्ल पुरस्कार” ( Best Athlete In Girl Award ) मिळाला. सोशल मीडियाद्वारे देखील मोठया प्रमाणात कौतुक करण्यात आले.
खेळासोबत अभ्यासाला देखील तितकंच महत्व देते. गृह पाठ असेल, प्रोजेक्ट असेल, किंवा असाइन्मेंट्स असेल तिचं नेहमी अद्ययावत असते. दहावी बोर्ड परीक्षेत ८८% गुण मिळवले आहेत. घरात आई, वडील सोबत मोठे पप्पा, मोठी मम्मी, दोन भाऊ असं एकत्र कुटुंब आहे. लहानपणापासून कुटुंबातील सगळ्या सदस्यांकडून प्रोत्साहन, सपोर्ट आणि वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आले आहे.
आकांक्षा विक्रम सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मी कराटेच्या ग्रँड चॅम्पियनशिप मध्ये प्रथम उपविजेतेपद पटकावले. त्याबद्दल खूप आनंद होतोय. गेल्या वर्षी माझे दहावीचे वर्ष होते. त्याच्यामुळे मला कराटे क्लासला जास्त वेळ जाता येत नव्हते. तरी पण मी वेळ काढून कधी कराटे क्लासला जायचे. इयत्ता १०वी नंतर मी पुन्हा कराटेचा सराव चालु केला. भरपुर मेहनत केली. पप्पा रोज मला सकळी धावण्यासाठी उठवायचे. माझ्या पेक्षा माझ्या प्रतिस्पर्ध्यांचा सराव जास्त होता.
हेही वाचा : गिरगावचा राजाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया’त नोंद
चॅम्पियनशिपसाठी, पण माझ्या दहावीच्या अंतरामुळे माझा सराव थोडा कमी झाला. अश्याप्रकरे मला ग्रँड चॅम्पियनशिप मध्ये प्रथम उपविजेतेपद मिळाले. माझे कराटे प्रशिक्षक इर्शाद शेख सर आणि सोनल मॅडम यांचे मार्गदर्शन आणि माझ्या कुटुंबाचे पाठबळ यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. कराटे स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल आकांक्षा सोनवणे हिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.