
मुंबई :
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत येत असताना शनिवारी विजय घोगरे () या आंदोलकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे आंदोलनाला गालबोट लागले आहे.
मराठा आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून आंदोलक मुंबईमध्ये येत आहेत. आंदोलनासाठी मुंबईमध्ये आलेला लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव गावचा रहिवासी विजय घोगरे या आंदोलकाला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला तात्काळ जी. टी. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने
त्यामुळे या आंदोलनाचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आले.
हेही वाचा : मराठा आंदोलकांसाठी अवघ्या १० रुपयांत रेल्वे स्थानकातील सुविधा
आंदोलनासाठी येणारे अनेक आंदोलक दोन दिवसांपासून जी. टी रुग्णालय आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी जात आहे. या दोन्ही रुग्णालयांमध्ये दोन दिवसांमध्ये जवळपास १०० रुग्णांनी बाह्य रुग्ण विभागामध्ये उपचार घेतले. यामध्ये अंगदुखी, डोकेदुखी, हातपाय दुखणे, सर्दी अशा सामान्य आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे.