मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व क्षत्रिय युनियन क्लब (क्षात्रैक्य समाज, मुंबई) यांच्या संयुक विद्यमाने वनमाळी हॉल, दादर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात जळगावच्या नईम अंसारीने आपल्या पहिला राज्य मानांकन कॅरम स्पर्धेतील विजय मिळवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
अंतिम सामन्यात त्याने आंतर राष्ट्रीय खेळाडू पुण्याच्या अभिजित त्रिपनकरचा अतिशय चुरशीच्या लढतीत २३-१४, ७-२५ व २५-६ असा पराभव केला. तर दुसरीकडे महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या काजल कुमारीने विजतेपद मिळविताना रत्नागिरीच्या आकांक्षा कदमचा ६-२५, २४-१९ व २५-१५ असा पराभव केला.
पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या फहिम काझीने मुंबईच्या विकास धारियावर २५-०, २०-७ अशी सहज मात केली. दुसरीकडे महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने मुंबईच्या मिताली पाठकवर तीन सेटनंतर २४-१०, ९-२५ व १५-१५ असा निसटता विजय मिळविला. विजेत्यांना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.