आरोग्य

मुंबईकरांनो मतदान करा आणि वैद्यकीय तपासणीत ५० टक्के सूट मिळवा

मतदान वाढविण्यासाठी अपेक्स हॉस्पिटल समूहाचा उपक्रम

मुंबई :

बोरिवली कांदिवली व मुलुंड येथील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविणाऱ्या अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या सर्व हॉस्पिटलने मतदान वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केलेल्या नागरिकांना २१ मे ते ३१ मे दरम्यान वैद्यकीय तपासण्यांवर ५० टक्के सूट मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून जोरदार प्रचार चालू असला तर मतदारांमध्ये निवडणुकीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळालेला नाही. गेल्या दोन ते तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याआधीच्या निवडणुकांपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोग वेगवेगळ्या जाहिराती, पथनाट्यांद्वारे लोकांमध्ये मतदानासाठी जनगागृती करत आहे. त्यांना या कामात सरकारी व खाजगी संस्था, दवाखाने व हॉस्पिटल्स यांची मदत मिळत आहे. बोरिवली कांदिवली व मुलुंड येथील नागरिकांना आरोग्यसेवा पुरविणाऱ्या अपेक्स हॉस्पिटल समूहाच्या सर्व हॉस्पिटलने मतदान वाढविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान केलेल्या नागरिकांना २१ मे ते ३१ मे दरम्यान वैद्यकीय तपासण्यांवर ५० टक्के सूट मिळणार आहे.

भारतातील आरोग्य उपचारांचा महागाई दर आशिया खंडात सर्वाधिक आहे यामध्ये ४० ते ५० टक्के खर्च हा वैद्यकीय तपासणीवर होत असतो. १२ ते १८ तास कामामुळे बाहेर राहिल्यामुळे मुंबईकरांमध्ये नकळतपणे जंक फूड खाण्याची लागलेली सवय, ताण, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि धुम्रपान यामुळे विविध आजारात वाढ झाली आहे. आपल्या शरीरात कोणत्या गंभीर आजाराचा शिरकाव झाला आहे कि नाही ? तसेच गेल्या तीन महिन्यातील शुगर तपासणी, लिव्हर व किडनी व हृदय तपासणी अशा विविध वैद्यकीय तपासणीमध्ये ५० टक्के सूट मिळणार आहे. मतदारांनी ९८२०३३२५१५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अपेक्स हॉस्पिटल समूहाने केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *