क्रीडा

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या विविध उपसमित्या जाहीर

उपाध्यक्षपदी अभिमन्यू पवार, अश्विनी पाटील, ग्रीष्मा पाटील यांची नियुक्ती

पुणे :

येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधीना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या ग्रीष्मा पाटील, पुण्यातील अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमित्या जाहीर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत.

स्विकृत शासकीय परिषद सदस्य :

१) जनार्दन शेळके, बीड २) नामदेव गोमारे, लातूर ३) प्राची वाईकर, पुणे ४) माधुरी कोळी, ठाणे ५) सुजाता शानमे, धाराशिव ६) प्रविता माने, रायगड
कार्यालयीन सचिव : डॉ. प्रशांत इनामदार, सांगली

स्पर्धा समिती :

१) संदीप तावडे, रत्नागिरी कार्यकारी अध्यक्ष, २) कमलाकर कोळी, ठाणे, सचिव, ३) रमेश नांदेडकर, नांदेड, सदस्य, ४) जगदीश दवणे, पालघर, सदस्य

खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती : 

१) प्रा. डॉ. नागनाथ गजमल, हिंगोली कार्यकारी, अध्यक्ष २) डॉ. नरेंद्र कुंदर, मुंबई उपनगर, सचिव ३) आशिष पाटील, रायगड, सहसचिव ४) निलेश परब, मुंबई, सदस्य ५) सुरेंद्र विश्वकर्मा, मुंबई, सदस्य ६) महेंद्र गाढवे, सातारा, सदस्य ७) कृष्णा करंजळकर, रत्नागिरी, सदस्य ८) प्रियांका चव्हाण, ठाणे, सदस्य ९) श्वेता पाटेकर, मुंबई, सदस्य

पंच मंडळ :

१) सुधाकर राऊळ, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) प्रशांत पाटणकर, मुंबई उपनगर, सचिव, ३) नानासाहेब झांबरे, पुणे, सहसचिव, ४) शरद व्हनकडे, सोलापूर, सदस्य, ५) संदेश आंब्रे, मुंबई उपनगरस, सदस्य, ६) डॉ. रफिक शेख , जालना, सदस्य, ७) किशोर पाटील, ठाणे, सदस्य ८) प्रभाकर काळे, धाराशिव, सदस्य, ९) संतोष सावंत, परभणी, सदस्य, १०) किरण वाघ, पुणे, सदस्य, ११) डॉ. रत्नराणी कोळी, लातूर, सदस्य

निधी समिती :

१) राजेंद्र महाले, धुळे, कार्यकारी अध्यक्ष, २) अनिल खोचरे, धाराशिव, सचिव, ३) सचिन मुळे, छ. संभाजीनगर, सदस्य, ४) डॉ. समीर शेख, सांगली, सदस्य, ५) बाळासाहेब जामकर, परभणी, सदस्य, ६) यतीन जाधव, रत्नागिरी, सदस्य, ७) डॉ. राजेश सुभेदार, मुंबई उपनगर, सदस्य, ८) सुर्यकांत ठाकूर, रायगड, सदस्य

पुरस्कार छाननी समिती : 

१) श्रीकांत ढेपे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) जगदीश नानजकर, पुणे, सचिव, ३) निर्मल थोरात, अहमदनगर, सदस्य, ४) शिरीन गोडबोले, पुणे, सदस्य, ५) सौ. सुप्रिया गाढवे, धाराशिव, सदस्य

प्रसिद्धी समिती :

१) अजित संगवे, सोलापूर, कार्यकारी अध्यक्ष, २) राजेश कळंबटे, रत्नागिरी, सचिव, ३) महेश विचारे, मुंबई, सदस्य, ४) भूषण कदम, पुणे, सदस्य, ५) संदीप बल्लाळ, पुणे, सदस्य, ६) दादासाहेब चोरमले, सातारा, सदस्य, ७) प्रेमचंद चौधरी, जळगाव, सदस्य, ८) गणेश माळवे, परभणी, सदस्य

अनुशासन समिती :

१) श्रीरंग इनामदार, पुणे, कार्यकारी अध्यक्ष, २) ॲड. बालाजी सगर किल्लारीकर, छ. संभाजीनगर, सचिव, ३) ॲड. जयदीप वंशपायन, नाशिक, सदस्य, ४) संजीव ठाकूर-देसाई, मुंबई, सदस्य, ५) मनोज परदेशी, नंदुरबार, सदस्य

महिला कल्याण समिती :

१) सारिका काळे-खोत, धाराशिव, कार्यकारी अध्यक्षा, २) राखी जोशी, पुणे, सचिव, ३) नेहा तपस्वी-ताडे, पुणे, सदस्य, ४) भाग्यश्री फडतरे, सातारा, सदस्य,

ॲथलिट कमिशन :

१) एजस शेख, मुंबई, कार्यकारी अध्यक्ष, २) रोहिणी आवारे, धाराशिव, सचिव, ३) प्रियांका येळे, सातारा, सदस्या, ४) श्वेता गवळी, अहमदनगर, सदस्या, ५) पराग आंबेकर, मुंबई, सदस्य, ६) आशुतोष गायकैवारी, पुणे, सदस्य, ७) युवराज जाधव, सांगली, सदस्य

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *