मुंबई :
मध्य रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी ३० मे २०२४ मध्यरात्रीपासून विशेष मेगा ब्लॉक घेतला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास जाताना गैरसोयीचे होऊ शकेल. यामुळे १ जून २०२४ रोजीच्या होणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
१ जून रोजी अभियांत्रिकी शाखेची सत्र ८ ची एक व बीएमएस ( ५ वर्षीय एकत्रित अभ्यासक्रम) सत्र २ ची एक अशा दोन परीक्षा होत्या. मध्य रेल्वेच्या मेगा ब्लॉक मुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
३१ मे रोजीच्या परीक्षा
३१ मे २०२४ रोजी विविध विद्याशाखेच्या एकूण ४३ परीक्षा होत्या. परंतु आजच्या रेल्वेच्या मेगा ब्लॉकचा कोणताही परिणाम आजच्या परीक्षेवर झाला नाही.
- विज्ञान शाखेच्या ३ परीक्षा
- अभियांत्रिकी शाखेच्या २७ परीक्षा
- वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या ८ परीक्षा
- मानव्य विद्या शाखेची १ परीक्षा
- आंतर विद्याशाखेच्या ४ परीक्षा
- एकूण ४३ परीक्षा