मुंबई :
आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्या प्रेक्षकांसाठी विठुरायाचे खास भक्तिमय चित्रपट घेऊन येत आहे. आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात विशेष महत्त्वाचा मानला जातो, जिथे भक्तगण विठ्ठल मंदिरात जाऊन आणि आपआपल्या घरात भजन, किर्तन आणि प्रार्थना करतात. या विशेष प्रसंगी, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीने आपल्या प्रेक्षकांसाठी पाच अत्यंत लोकप्रिय भक्तिपूर्ण चित्रपट उपलब्ध करून दिले आहेत.
संत गोरा कुंभार
संत गोरा कुंभार या चित्रपटात भगवान विठ्ठलाचे परमभक्त असलेल्या आणि महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक थोर संत यांची कथा आहे. त्यांच्या भक्तीची आणि निष्ठेची अद्भुत कहाणी या चित्रपटात पाहायला मिळेल. 1967 साली प्रदर्शित झालेल्या आणि राजा ठाकूर दिग्दर्शित या चित्रपटात अनेक नामांकित कलाकारांनी काम केले आहे. सुलोचना, उमा, लिला गांधी, काला दीक्षित, कुमार दिघे, प्रसाद सावकर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. सुधीर फडके यांच्या संगीताने प्रत्येक गाण्याला भक्तीमय रंग दिला आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचे हृदय पांडुरंगाच्या भक्तीत रंगून जाते.
देवाचिये द्वारी
संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा व भक्ती चळवळीत घेतलेल्या भूमिकांचा उलगडा करतो. जयश्री गडकर, बाळ धुरी आणि मधु कांबीकर यांच्या अभिनयानं सजीव झालेला हा चित्रपट एक विशेष अनुभव देतो.
संत निवृत्ती ज्ञानदेव
मधुकर पाठक दिग्दर्शित हा चित्रपट संत निवृत्ती आणि संत ज्ञानदेव यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांच्या शिकवणींचा प्रभाव दाखवतो. या चित्रपटात भारतीय अध्यात्मावर त्यांचा ठसा अधोरेखित केला आहे.
ढ लेकाचा
पुरस्कारप्राप्त “ढ लेकाचा” या चित्रपटात विठ्ठलाचे भक्त अण्णा यांच्या भक्तीचे दोन गाणी आहेत. पहिलं गाणं म्हणजे ‘मन धावतया चंद्रभागे काठी’ जे देवाच्या दर्शनाची उत्सुकता आणि दुसरं गाणं ‘ऐलतिरी एकला मी’ भक्तीचे स्वरूप दर्शवते.
माहेर माझे हे पंढरपूर
मिलिंद स्वामी दिग्दर्शित या चित्रपटात भगवान पांडुरंगावर दृढ श्रद्धा असलेल्या मुलीची कथा आहे. तिच्या श्रद्धेच्या जोरावर तिच्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांची ही कहाणी आहे. समीर धर्माधिकारी, बाळ धुरी आणि आशाताई वाबगावकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने अनेक प्रेक्षकांना भक्तीचा अर्थ समजावला आहे.
अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, “आम्हाला आनंद आहे की आम्ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी या विशेष चित्रपटांचा संग्रह आणू शकलो.” आषाढी एकादशीच्या निमित्ताने, अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या भक्तिमय चित्रपटांचा आनंद घ्या आणि आपल्या श्रद्धेला नवी दिशा द्या.