आरोग्य

१२ वर्षांच्या मुलीच्या अवयवदानामुळे मिळाले चौघाना जीवनदान

ब्रेन डेड झालेल्या मुलीच्या पालकांनी घेतला अवयव दानाचा निर्णय - किडनी, यकृत आणि हृदय दान

मुंबई :

परळच्या बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन येथे मेंदू मृत घोषित करण्यात आल्यानंतर १२ वर्षीय मुलीच्या पालकांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. यावेळी या मुलीची दोन्ही किडनी, यकृत आणि हृदय दान करण्यात येऊन समाजासमोर एक आदर्श ठेवण्यात आला. यापैकी एक किडनी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनमध्ये प्राप्तकर्त्याला दान करण्यात आली आणि दुसरी केईएम हॉस्पिटलमध्ये गेली तर तिचे यकृत ग्लेनईगल्स हॉस्पिटल, मुंबई तर हृदय चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

सप्टेंबर २०२० मध्ये सांताक्रूझ, मुंबई येथील रहिवासी असलेल्या वैदेही भाऊ तानावडे हिला इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिक परपुरा (ITP) चे गंभीर आजाराचे निदान झाले. या उपचाराचा एक भाग म्हणून तिला इम्युनोसप्रेसेंट्स आणि मॉड्युलेटर्सवर ठेवण्यात आले होते. सप्टेंबर 2022 मध्ये तिला इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन (IVIG) प्राप्त झाले त्यानंतर १३ जून २०२३ आणि १० जुलै २०२४ रोजी तिला पॅक्ड रेड ब्लडसेल्स (PRBCs) चे संक्रमण झाले. हळुहळु तिची तब्येत ढासळत गेली. १३ जुलै रोजी पहाटे वैदेहीला अचानक अशक्तपणामुळे एन्सेफॅलोपॅथी (मेंदूसंबंधीत बिघाड) आणि हेमेटेमेसिस (रक्ताच्या उलट्या) होऊ लागल्याने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीटी स्कॅनमध्ये हर्नियेशनसह गंभीर इंट्राक्रॅनियल रक्तस्त्राव झाला आणि तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. त्यानंतर अवयवदानाबाबत तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले आणि तिचे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय दान करण्यात आले.

आपल्या मुलीचे अवयव दान करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने वाडिया हॉस्पिटलने त्यांचे कौतुक केले. निःस्वार्थतेची ही कृती करुणा आणि सहानुभूतीचे उत्तम उदाहरण आहे. या पालकांनी आपली मुलगी गमावली आहे असून आम्हाला याचे दु:ख आहे. आपल्या मुलीचे अवयव गरजुंना दान करण्याचा निर्णय या पालकांनी घेतल्याने आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. हे पालक खरोखरच सुपरहिरो आहेत. समाजात अवयव दानाचे महत्व पटवून देण्यासाठी त्याबाबात पुरेशी जनजागृती आवश्यक असल्याची प्रतिक्रिया वाडिया हॉस्पिटल्सच्या सीईओ डॉ मिनी बोधनवाला यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *