शहर

एसटीच्या सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा; गाडीत सापडलेले प्रवाशाचे पैशाचे पाकीट दिले परत

ठाणे :

एसटीमध्ये सापडलेले कोणतेही सामान आजपर्यंत वाहकांकडून प्रवाशांना परत दिल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे आगारात गाडीची साफसफाई करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एका प्रवाशाचे पैशाने भरलेले पाकीट सापडले. ‘ ‘सदैव प्रवाशांच्या सेवेत’ या एसटीच्या बोधावाक्याप्रमाणे या कर्मचाऱ्याने आपला प्रामाणिकपणा दाखवत प्रवाशाला संपर्क करत त्याचे पाकीट त्याला परत केले. या पाकिटात तीन ते चार हजार रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती.

कोल्हापूर ठाणे ही एसटी १९ जुलै रोजी मध्यरात्री प्रवाशांना वंदना एसटी स्टँडवर सोडून आगार क्रमांक २ येथे आली. दैनंदिन कामाचा भाग म्हणून प्रवास करून आगारात आलेल्या गाडीची सफाई कर्मचाऱ्याकडून साफसफाई केली जाते. ठाणे आगार क्रमांक २ येथील सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड या गाडीची सफाई करत असताना गाडीत मिलिंद साळवी या प्रवाशाचे पैशाचे पाकीट पडल्याचे  आढळले. या पाकिटात ३ ते ४ हजाराची रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे होती. मोतीलाल राठोड यांनी प्रामाणिकपणा दाखवत पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून मिलिंद साळवी यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांना पैशाचे पाकीट गाडीमध्ये सापडले असल्याचे सांगत त्यांना ते घेऊन जाण्यास सांगितले. सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. मिलिंद साळवी यांनीही सफाई कर्मचारी मोतीलाल राठोड व लालपरीबाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *