धारावी :
धारावीकर व धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी अदानीच्या सर्व्हे करणाऱ्यांना काळे फासून विरोध केला. त्यामुळे साईबाबा नगर येथे सुरू असलेला सर्व्हे बंद पाडला. तसेच राजीव गांधी नगर ट्रान्झिट कॅम्प येथे सुरू असलेला सर्व्हे तेथील कुंचिकोर्वे समाजाच्या लोकांनी धारावी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांसोबत बंद पाडला. तेथे खुद्द तहसीलदार आले होते. ॲड संदीप कटके यांनी दाखवलेल्या शासन निर्णयामध्ये धारावीतील अपात्र लोकांना धारावीच्या बाहेर ढकलण्याचा डाव आहे, असे दाखवून दिले तेव्हा तेथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. धारावीचे पोलिस तसेच स्थानिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित यावेळी होते.
सत्ताधारी पक्षाच्या गुमराह व काही पगारी कार्यकर्त्यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण लोक धारावी बचाव आंदोलनाच्या सोबत उभे राहिले हे बघून अदानी कंपनीच्या सर्व्हे टीमने तेथून काढता पाय घेतला. परंतु काही चुकीचा नरेटिव सेट करून खोटा प्रचार करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. आज आम्ही धारावीत आहोत आणि उद्या ही आहोत. बघुया तुम्ही पुढचा सर्व्हे कसा करताय. खोट्या बातम्या देऊन धारावीकरांना बदनाम करण्याचा तुमचा हा प्रयत्न तुमच्याच अंगलट येणार आहे. उद्या या पुन्हा भेटूया दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या, असा इशारा यावेळी धारावीकरांनी दिला.