शिक्षण

अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे :

ठाण्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील इयत्ता १ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना २५ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या मुलांना मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सुखरूप घरी पोहाचावावे असे आदेश दिले आहेत.

प्रादेशिक हवामान विभागाने २५ जुलै २०२४ रोजी सकाळी ७ वाजता जारी करण्यात आलेल्या चेतावणीनुसार ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व माध्यमाच्या आणि मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना २५ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ सत्रातील विद्यार्थी शाळेत आले असल्यास विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहचतील याची दक्षता मुख्याध्यापक व शिक्षकांनी घ्यावी, अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *