मुंबई :
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच समाजकार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राखी पौर्णिमेनिमित्त देशाच्या संरक्षणार्थ कर्तव्य निभावणाऱ्या शूरसैनिकांसाठी ६५०० राख्या विद्यापीठाच्या विविध विभागामार्फत तसेच विविध विभाग प्रमुख कर्मचारी संघटना व विद्यार्थिनीच्या वतीने जम्मू-काश्मीर, राजौरी, पलमा येथे पाठवण्यात येत आहेत.
सैनिकांप्रती आपली जबाबदारी, ऋणानुबंध, कृतज्ञता, जिव्हाळा या संकल्पने अंतर्गत मागील तीन वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी देखील ‘स्नेहबंध ‘ हा उपक्रम विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. उज्चला चक्रदेव यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या उपक्रमासाठी आजीवन अध्ययन विस्तार विभागाचे व समाजकार्य विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण यांनी पुढाकार घेतला. या उपक्रमासाठी विद्यापीठाच्या विविध विभागातील विभाग प्रमुख, संचालक तसेच डॉ. सुभाष चव्हाण, डॉ. संजय शेडमाके डॉ. संजय फड तसेच शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे यशवंत गावडे, अंगद पुकळे, अभिजीत कोठेकर आदींनी सहकार्य केले.