शहर

सांगा उद्धवजी, मराठी बांधवाना बलात्कारी म्हणणाऱ्या काँग्रेससोबत की महाराष्ट्रासोबत आहात?

शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांचा उद्धव ठाकरेंना परखड सवाल

मुंबई :

काँग्रेस प्रवक्ते आलोक शर्मा यांनी मराठी बांधवाना बलात्कारी म्हटल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेचे खासदार मिलिंद देवरा यांनी शर्मा यांच्या आपत्तीजनक वक्तव्याचा निषेध करत थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धवजी ज्या मराठी माणसांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता,त्या मराठी बांधवांचा अपमान कसा सहन करता? असा सवाल देवरा यांनी केला.तसेच उद्धवजी सांगा ज्या काँग्रेसच्या नेत्याने मराठी बांधवाना बलात्कारी म्हटले, त्या काँग्रेससोबत तुम्ही आहात की महाराष्ट्रासोबत, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

काँग्रेसचे खासदार अलोक शर्मा यांनी हिन्दी वृत्त वाहिनीच्या चर्चेत मराठी अस्मितेला धक्का पोहचवणारे वक्तव्य केले आहे. शर्मा यांनी मराठी समाज बलात्कारी असल्याचे आपपत्तिजनक वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठीचा असा अपमान शिवसेना सहन करणार नाही. मराठी अस्मितेसाठी आणि स्वाभिमानासाठी शिवसेना शर्मा यांना धडा शिकवणारच असेही देवरा यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *