शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या बनावट संकेस्थळापासून सावधान

सायबर पोलिसात तक्रार दाखल

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे बनावट संकेतस्थळ आढळून आल्याने अशा बनावट संकेतस्थळापासून सर्व विद्यार्थी आणि भागधारकांनी सावधान राहण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राचे प्रवेशासाठी व इतर अनुषंगिक बाबींसाठी https://mu.ac.in/distance-open-learning हेच अधिकृत संकेतस्थळ असून फक्त याच संकेतस्थळाचा वापर करावा असेही आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. विद्यापीठाने याबाबतची गंभीर दखल घेत बीकेसी सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु असून प्रवेश प्रक्रियेस ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी https://mucdoeadm.samarth.edu.in/ फक्त या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. तर पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या प्रवेशासाठी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षासाठी https://idoloa.digitaluniversity.ac/ फक्त या अधिकृत संकेतस्थळावरूनच ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन मुंबई विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. तसेच विविध समाजमाध्यमात मुंबई विद्यापीठ आणि दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करण्यात आले असून अशा बनावट अकाऊंट्सपासूनही सावधान राहण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र आणि मुंबई विद्यापीठ यांचे अधिकृत समाजमाध्यमांचे अकाऊंट असून फक्त अशाच अधिकृत अकाऊंट्सवरून प्रसिद्ध केलेली माहिती खरी समजण्यात यावी असेही विद्यापीठाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *