मुंबई :
येत्या ३१ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्सच्या संयुक्त विद्यमाने ‘किड्स स्पोर्ट्स कार्निव्हल’चे आयोजन बोरीवली (पश्चिम) येथे करण्यात आले आहे.
३१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत प्राथमिक विभागासाठी आणि दुपारी १२ ते ३ या वेळेत पूर्व-प्राथमिक विभागासाठी अनुक्रमे सुविद्या स्पोर्ट्स अकादमी, गोराई, बोरीवली (पश्चिम) येथे “किड्स स्पोर्ट्स कार्निव्हल” आयोजित करण्यात आला आहे. पारितोषिक वितरण समारंभ त्याच दिवशी संपन्न होईल.
ह्या क्रीडा महोत्सवा मध्ये पश्चिम मुंबई उपनगरातील १५ शाळा आणि ९०० पालक आणि मुले सहभागी होणार आहेत. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, वीरमाता डॉ. अनुराधाताई गोरे ह्या उपस्थित राहणार आहेत.