मुंबई :
नाहूर गाव ते मुलुंड लिंक रोड पर्यंत समांतर जोडमार्ग बांधून तो वाहतूकीसाठी सुरु करण्यात यावा, तसे झाल्यास मुलुंड पश्चिमेकडे जाण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत या मार्गाचा वापर करणे सोयीस्कर होणार असल्याची माहिती ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी दिली.
नाहूर गावावरुन मुलुंड लिंक मार्ग मुलुंड पुर्व येथील सनरुप इमारतीपर्यंतचा समांतर मार्गाचा विकास आराखडा २०३४ नुसार मंजूर करण्यात आला आहे. यानुसार समांतर लिंक रोड बांधून तो वाहतूकीसाठी सुरु झाल्यास मुलुंड पुर्व व पश्चिमेकडे जाणा-या वाहनांना तसेच शाळा, महाविद्यालय व नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ पोहचणे सोयीचे होणार आहे. तसेच कमीत कमी वेळत खासगी वाहने, बसेस, रिक्षा यांनाही ये-जा करण्यासाठी जवळचा सोयीस्कर असा लिंक रोड उपलब्ध होणार आहे. तसेच बबनराव कुलकर्णी मार्ग ते मुलुंड स्टेशन पुर्व पर्यंत हा मार्ग जोडला जाण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या मार्गाचे काम लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे.