मनोरंजन

रंग वलय ग्रुप चित्रप्रदर्शन आजपासून जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये

मुंबई :

सात कलाकारांच्या आगळ्यावेगळ्या रंगकृतींचा समावेश असलेले रंग वलय हे ग्रुप प्रदर्शन १ ऑक्टोबर २०२४ पासून जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, फोर्ट येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता या वेळेत भरविण्यात आले आहे.

या ग्रुप चित्रप्रदर्शनामध्ये जितेंद्र धरणे, इनायत शिदवणकर, दयानंद देसाई, हेमंत थोरात, पूनम साळवी, परेश साळवी आणि अमोल तांबे यांच्या चित्रकृती पाहता येतील. निसर्ग व निसर्ग चक्र यावर आधारित ही चित्रे मूर्त व अमूर्त स्वरूपातील आहेत. याशिवाय विविध माध्यमांचा वापर करून रेखाटलेली लँडस्केप पेंटिंग, क्रिएटिव्ह पेंटिंगचा या प्रदर्शनात समावेश आहे. या ग्रुप प्रदर्शनाचे उद्घाटन अकुटी डिझाईन हाउसच्या उर्मिला घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता होईल. सात कलाकारांच्या आगळ्यावेगळ्या रंगकृतींचा समावेश असलेले रंग वलय हे ग्रुप प्रदर्शन पाहायला अधिकाधिक रसिकांनी भेट द्यावी, असे आवाहन चित्रकार आणि आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *