क्रीडा

३४ वी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धा : महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट

साताऱ्याचा प्रसाद बळीप भरत पुरस्काराचा तर सांगलीची वेदिका तामखडे इला पुरस्काराची मानकरी

सिमडेगा (झारखंड)

पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने विजेतेपदासह दुहेरी सुवर्ण मुकुट संपादला. किशोर गटाचे हे सलग ९वे तर किशोरी गटाचे ७ वे विजेतेपद आहे. साताराच्या प्रसाद बळीपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा भरत पुरस्कार तर सांगलीच्या वेदिका तामखडेला इला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

महाराष्ट्र विरुद्ध तेलंगणा हा मुलांचा अंतिम सामना अतिशय अटीतटीचा व चुरशीचा झाला. या सामन्यात मध्यंतराला १ गुणाने पिछाडीवर असलेल्या महाराष्ट्राने हा सामना अखेर २४-१५ असा ९ गुणांनी जिंकला. महाराष्ट्रा कडून भीमसिंग वसावे २ मि. संरक्षण व १ गडी, श्री दळवी १.१० मि. संरक्षण व १ गडी, प्रसाद बळीप १, २ मि. संरक्षण व ३ गडी, सचिन थोरात १.१०, १ मि. संरक्षण व १ गडी, विनायक भांगे १.२० मि. संरक्षण अशी सांघिक कामगिरी करत हा सामना जिंकला. तर तेलंगणाच्या सुंदरने १ मि. संरक्षण करून ८ गडी बाद करून सामन्यात चुरस निर्माण केली होती.

महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने १८ गुणांनी सहज विजय मिळवला. मध्यंतराला १४-४ अशी आघाडी घेत महाराष्ट्रने २६-८ असा सामना जिंकला. महाराष्ट्राकडून वेदिका तामखडेने पहिल्या डावात ५ मिनिटे संरक्षण केले. तिला सिद्धी भोसले १.३० मि. संरक्षण ३.५० मि. संरक्षण व ५ खेळाडू बाद करत मोलाची साथ दिली. श्रावणी तामखडेने नाबाद ३ मि. संरक्षण करताना २ खेळाडू बाद केले तर गौरी जाधवने ३ खेळाडू बाद केले. तर कर्नाटकच्या इंच्रा २, १.५ मि. संरक्षण करून 4 खेळाडूंना बाद केले व गौतमीने १, १.४० मि. संरक्षण करून चांगली लढत दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *