मुंबई :
विजयादशमीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे ‘महाराष्ट्र खेल पुरस्कार २०२४’ या पुरस्काराच्या नोंदणीसाठी सुरुवात होत आहे. कला, क्रीडा, कार्य आणि कर्तव्य या क्षेत्रातून पुरस्कार जाहीर करणार आहेत.
पहिली यादी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमीच्या दिवशी जाहीर होईल. दुसरी यादी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नरक चतुर्दशी या दिवशी जाहीर केली जाईल. इच्छुक सदस्यांनी आपली नावे नोंदवावी. सत्कारमूर्ती व्यक्तीने आपल्या आयुष्याचा बराच काल ज्या क्षेत्रातून दिला त्या क्षेत्रातून पुरस्कार प्रदान करुण त्यांचा सन्मान करण्यात येईल. नोंदणीसाठी ९९२००६३३७३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडूून करण्यात आले आहे.
कला क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कार्य क्षेत्र आणि कर्तव्य क्षेत्र अशी पुरस्कारांसाठी विभागणी केली असून, यामध्ये कला क्षेत्रामध्ये चित्र कला, वाद्य कला, शिल्प कला, नृत्य कला, चित्रपट कला यांचा समावेश असून, क्रीडा क्षेत्र प्रकारामध्ये सर्व प्रकारचे खेळ व ज्या खेळांच्या स्पर्धा शालेय स्तरावर खेळले जातात, यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमणे कार्य क्षेत्र या प्रकारामध्ये समाज सेवक, उद्योजक, सामाजिक संस्था, सहकरी संस्था, कार्यकर्ता तसेच समाजासाठी ज्या व्यक्तीने योगदान दिले आहे, अशी व्यक्ती या पुरस्कारासाठी नोंदणी करू शकते. कर्तव्य क्षेत्र या प्रकारात सैन्य दल, पोलीस, रेल्वे, शालेय शिक्षक, सरकारी कर्मचारी, सफाई कामगार, डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ, बँक कर्मचारी, इसेन्शियल वर्किंग स्टाफ यांचा समावेश करण्यात आला आहे. आकर्षक सन्मानचिन्ह, प्रमारपत्र, ओळख पत्र असे ‘महाराष्ट्र खेल पुरस्कार २०२४’ पुरस्काराचे स्वरुप आहे.
विजयादशमीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे ‘महाराष्ट्र खेल पुरस्कार २०२४’ या पुरस्काराच्या नोंदणीसाठी सुरुवात होत आहे. पहिली यादी १२ ऑक्टोबर २०२४ रोजी विजयादशमीच्या दिवशी जाहीर होईल. दुसरी यादी ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी नरक चतुर्दशी या दिवशी जाहीर केली जाईल. इच्छुक सदस्यांनी आपली नावे नोंदवावी. सत्कारमूर्ती व्यक्तीने आपल्या आयुष्याचा बराच काल ज्या क्षेत्रातून दिला त्या क्षेत्रातून पुरस्कार प्रदान करुण त्यांचा सन्मान करण्यात येईल. नोंदणीसाठी ९९२००६३३७३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडूून करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र खेल पुरस्कार २०२४’ पुरस्काराचे प्रकार
उत्कृष्ट कला पुरस्कार , उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार, उत्कृष्ट कार्यसम्राट पुरस्कार, कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, उत्कृष्ट कला व क्रीडा मार्गदर्शक आणि जीवन गौरव पुरस्कार वयोमर्यादा ६० वर्षे