शहर

मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा अशक्य, तीनपैकी एकही प्रकल्प मार्गी नाही

मुंबई :

निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी मंडळींकडून दिलेल्या आश्वासनाची पुर्तता होईलच याची काहीच शक्यता नसते, आताही असेच घडले असून मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन फोल ठरले आहे. त्यामुळे मतांसाठी राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांनी जनतेला केवळ मतांसाठी ग्राह्य धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलुंडकरांनी संताप व्यक्त केला आहे. मुलुंड व वांद्रे परिसरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग फसला असून धरणात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीच नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुलुंड ते घाटकोपर डोंगराळ भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मुंबई महानगरपालिका परिमंडळ सहाचे उपायुक्त संतोष कुमार धोंडे यांच्याशी ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी वारंवार चर्चा करून काही सूचना केल्या आहेत.

मुंबईला २४ तास पाणी पुरवठा केल्यास मुंबईतील भांडुप, कांजुर, घाटकोपर सारख्या उंच भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी पुरवठा होणे शक्य नसल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत मुलुंड व वांद्रे परिसरात २४ तास पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र मुंबईत २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी धरणाच्या अभ्यासा दौऱ्यादरम्यान सांगितले. तानसा, भातसा, वैतरणा, मोडकसागर, तुलसी व विहार धरणातून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. भविष्यातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या दमणगंगा, गारगाई व पिंजाळ या तीनपैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही.

गेल्या अडीच वर्षांत मुंबई महापालिकेची निवडणुक झाली नसल्याने पालिकेवर प्रशासक बसण्याची नामुष्की आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पालिका अधिकारी सामान्य नागरिकांना दाद देत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. भविष्यातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी प्रस्तावित केलेल्या दमणगंगा, गारगाई व पिंजाळ या तीनपैकी एकही नवीन पाणी प्रकल्प मार्गी लागलेला नाही. मतांसाठी राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांनी जनतेला केवळ मतांसाठी ग्राह्य धरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलुंडकरांनी संताप व्यक्त केला आहे. कधी नव्हे मुलुंड भागातही पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असून पालिका प्रशासन पुर्णत: निष्क्रिय झाल्याचे मत मुलुंडकरांनी मांडले असून पालिका अधिकारी कोणाच्या इशाऱ्यावर काम करीत आहे असा संतप्त सवालही मुलुंड, भांडुपकरांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *