मनोरंजन

लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचा एकमेव कायदेशीर वारस – नलिनी कुलकर्णी

पुणे :

विसाव्या शतकाचा कालखंड म्हणजे तमाशाचा सुवर्णकाळ. पठ्ठे बापूराव नावाचे ‘मिथक’ निर्माण झाले ते याच कालखंडात. लावण्यांचे विद्यापीठ असलेल्या या शाहिराची सांगीतिक यशोगाथा मराठी रुपेरी पडद्यावर येणार असतानाच ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ यांच्या सुनेने नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी श्रीधर कृष्णा कुलकर्णी तथा लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या सर्व गोष्टींच्या एकमेव कायदेशीर वारस असल्याचे सांगितले आहे.

याबाबत माहिती देण्यासाठी नलिनी गोविंद कुलकर्णी यांनी पुण्यात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, माझे सासरे अर्थात लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे नाव वापरून व त्यांच्या जीवनावर आधारित कोणतीही चित्रफीत, चित्रपट अथवा कोणत्याही दृक-श्राव्य स्वरूपाची इतर कोणतीही कलाकृती बनविण्यास किंवा साकारण्यास तसेच त्याची प्रदर्शन व विक्री करण्याकरिता २३ जुलै २०२४ रोजीच्या नोंदणीकृत हस्तांतरण कारारनाम्याने असमथी आणि ह्यूज प्रॉडक्शन्स यांना अधिकार दिलेले होते व आहेत.

असमथी आणि ह्यूज प्रॉडक्शन्स यांच्याशिवाय ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ या नावाचा वापर करण्याचा अथवा त्यांच्या जीवनावर आधारित कोणतीही कलाकृती बनविण्याचा, त्याचेप्रदर्शन व विक्री करण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार प्राप्त नव्हते व नाहीत. यांच्या व्यतिरिक्त कोणी चित्रपट केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सप्ष्टपणे नमूद केलं आहे. प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या “महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव” आणि “पठ्ठे बापूरावांच्या शोधात” या पुस्तकांवर आधारित लवकरच चित्रपट येत आहे. या पुस्तकांचे हक्क सुद्धा लिखीत स्वरुपात त्यांनी असमथी आणि ह्यूज प्रॉडक्शन्स यांच्या स्वाधीन केलेले आहेत. या परिषदेला लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचा नातू अवधूत गोविंद कुलकर्णी आणि नात अपर्णा गोविंद कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी नलिनी कुलकर्णी यांनी लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचे नाव वापरून व त्यांच्या जीवनावर आधारित कोणतीही चित्रफीत, चित्रपट अथवा कोणत्याही दृक-श्राव्य स्वरूपाची इतर कोणतीही कलाकृती बनविण्यास किंवा साकारण्यास तसेच त्याची प्रदर्शन व विक्री करण्याकरिता २३ जुलै २०२४ रोजीच्या नोंदणीकृत हस्तांतरण कारारनाम्याने असमथी आणि ह्यूज प्रॉडक्शन्स यांना अधिकार दिलेले होते व आहेत. त्यामुळे असमथी आणि ह्यूज प्रॉडक्शन्स यांच्याशिवाय ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव’ या नावाचा वापर करण्याचा अथवा त्यांच्या जीवनावर आधारित कोणतीही कलाकृती बनविण्याचा, त्याचेप्रदर्शन व विक्री करण्याचे कोणतेही कायदेशीर अधिकार प्राप्त नव्हते व नाहीत. यांच्या व्यतिरिक्त कोणी चित्रपट केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सप्ष्टपणे नमूद केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *