धाराशिव :
अलीगड, उत्तरप्रदेश येथे २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या ४३व्या कुमार व मुली (ज्युनिअर) राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे कुमार व मुली (ज्युनिअर) संघ महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी जाहीर केले.
धाराशिव येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून हे संघ प्रशांत कदम (सातारा), गोविंद शर्मा (छत्रपती संभाजीनगर), संदीप चव्हाण (पुणे) व भावना पडवेकर (ठाणे) या निवड समिती सदस्यांनी निवडले. या संघात धाराशिवबरोबरच सांगली, सोलापूर, ठाणे, पुणे, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, मुंबई उपनगर, रत्नागिरी, जालना या जिल्ह्यातील खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर १७ नोव्हेंबरपासून ओम साईश्वर मंडळ, लालबाग, मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्राचे संघ : कुमार गट : सोत्या वळवी, विलास वळवी, भरत वळवी, राज जाधव, जितेंद्र वसावे (सर्व धाराशिव), प्रज्वल बनसोडे, प्रेम दळवी, पार्थ देवकाते (सर्व सांगली), कृष्णा बनसोडे, शुभम चव्हाण (सर्व सोलापूर), आशिष गौतम (ठाणे), चेतन गुंडगळ, भावेश माशिरे (सर्व पुणे), अनय वाल्हेकर (अहिल्यानगर), प्रतिक जगताप (सातारा), प्रशिक्षक : युवराज जाधव (सांगली),
मुली गट : अश्विनी शिंदे, तन्वी भोसले, सुहानी धोत्रे, प्रणाली काळे (सर्व धाराशिव), सानिका चाफे, प्रतीक्षा बिराजदार, धनश्री तामखडे (सर्व सांगली), प्राजक्ता बनसोडे, स्नेहा लामकाने (सर्व सोलापूर), दीक्षा काटेकर, धनश्री कंक (सर्व ठाणे), सुषमा चौधरी (नाशिक), दिव्या गायकवाड (मुं. उपनगर), रिद्धी चव्हाण (रत्नागिरी), जोया शेख (जालना), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (मुंबई), व्यवस्थापिका सुप्रिया गाढवे (धाराशिव).