मुंबई :
गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास दोन कांस्य पदक मिळाली आहेत. ६८ किलो वजन गटात सय्यद उमर आणि ८७ किलो वजन गटात राज घुले या विद्यार्थ्यांना कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय विद्यापीठे संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील १२७ विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या वतीने विविध वजन गटातील ८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेमध्ये दोन कांस्य पदक प्राप्त केल्याबद्दल सय्यद उमर आणि राज घुले यांच्यासह प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांचे मार्गदर्शन लाभले.
भारतीय विद्यापीठे संघाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी देशभरातील १२७ विद्यापीठे सहभागी झाली होती. मुंबई विद्यापीठाच्या वतीने विविध वजन गटातील ८ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठास दोन कांस्य पदक मिळाली आहेत. ६८ किलो वजन गटात सय्यद उमर आणि ८७ किलो वजन गटात राज घुले या विद्यार्थ्यांना कांस्य पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.