मुंबई :
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२४-२०२५ चे आयोजन १६ ते १८ डिसेंबर २०२४ दरम्यान महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट हॉल, शिवाजी पार्क, दादर येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटात ही स्पर्धा रंगणार असून पुरुष गटातील पहिल्या ३२ तर महिला गटातील पहिल्या १६ विजेत्यांना मिळून एकंदर १० लाखांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून बाहेर गावच्या खेळाडूंची निवास, चहापान व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेबाबतची संपूर्ण माहिती प्रवेश अर्जासोबत असलेल्या माहितीपत्रकात देण्यात आली असून स्पर्धेचा प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. इच्छुक खेळाडूंनी आपली नावे दिनांक २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नोंदवावीत. स्पर्धेच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या संकेत स्थळावरून करण्यात येईल. पुरुष गटातील विजेत्याला रोख रुपये १ लाख ५० हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ७५ हजारांचे बक्षीस व ट्रॉफी देण्यात येईल. तर महिला गटातील विजेतीला १ लाख, उपविजेतीला ५० हजार व तिसऱ्या क्रमांकासाठीच्या खेळाडूस रोख रुपये ३० हजारांचे ईनाम व ट्रॉफी देण्यात येणार आहे. शिवाय पहिल्या फेरीपासून खेळाडूने केलेल्या व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅमसाठी रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.