शिक्षण

विकास महाविद्यालयात ‘एनएसएस युनिट’तर्फे मतदान जनजागृती

मुंबई :

नागरिकांमध्ये व आजच्या तरुण वर्गात मतदानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने विक्रोळी येथील विकास कला, विज्ञान व वाणिज्य महविद्यालयाच्या एन.एस.एस. युनिट तर्फे १६ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान जनजागृती फेरी आणि मतदान शपथ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाने लोकसभा निवडणुकीच्या वेळेसही सदर उपक्रमाचे आयोजन केले होते.

एन.एस.एस. युनिटमधील विद्यार्थी आपले सामाजिक दायित्व म्हणून मतदान केंद्रावर विविध प्रकारे मदत करत असतात. राष्ट्रनिर्माणासाठी मतदान करा, तुमचे मत, तुमचा आवाज, उज्वल भविष्यासाठी, आजच मतदान करा” आदी जनजागृतीपर संदेश फलक हाती घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती फेरी काढली. विकास महाविद्यालयातून ही फेरी निघाली व कन्नमवार नगर परिसरातून मार्गस्थ होऊन महविद्यालयात परत दाखल झाली. तसेच विविध घोषवाक्य पुकारत जनसामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व त्यांना मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याचे आवाहन केले. या फेरी मध्ये १५६ विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे अधिकारीसुद्धा होते. ६३ स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला.

संस्थेचे सचिव डॉ. विनय प. राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. पात्रा, एनएसएस युनिट कार्यक्रम अधिकारी प्रा. विनायक मुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *