शहर

एसटी कर्मचाऱ्यांना उद्या दिवाळी भेट रक्कम मिळणार

आर्थिक भार स्वीकारण्यास सरकारचा नकार

मुंबई : 

एसटी कर्मचाऱ्यांना उद्या दिवाळी भेट रक्कम मिळणार असून ही रक्कम वाटप करण्यासाठी सरकारचा नकार असून एसटी महामंडळ स्वतःच्या उत्पन्नातून देणार आहे. निधी उपलब्ध करून देण्यात सरकारने पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा नन्नाचा पाढा सुरूच आहे. अशी टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्याना मिळणारी या वर्षीची दिवाळी भेट रक्कम आचार संहितेचा अडथळा आल्याने रखडली होती. सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचार संहिता लागू होण्या अगोदर म्हणजेच १५ ऑक्टोंबर रोजी एसटी प्रशासनाने ५२ कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात यावा असा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

या प्रस्तावा संदर्भात महामंडळाने सरकारकडे वारंवार विचारणा करूनही सरकार कडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्या वेळी सरकारी अधिकाऱ्यांकडून आचार संहितेचे कारण सांगितले जात होते. आता आचार संहिता संपल्या नंतर ही रक्कम कर्मचाऱ्यांना तातडीने वाटप करण्यात यावी असे सरकारकडून एसटी प्रशासनाला कळविण्यात आले असून सरकार ही रक्कम एसटीला देणार नाही असेही सांगण्यात आले आहे. या मुळे सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात पुन्हा एकदा पलटी मारली असून सरकारचा दुटप्पीपणा उघड झाला आहे. सद्या एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असून अजूनही कर्मचाऱ्याना नक्त वेतन मिळत आहे. पी एफ, ग्राजुटी सारख्या रक्कमा वेतनातून कपात केल्या असे दाखविण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र सदरच्या रक्कमा ट्रस्टकडे भरल्या जात नाहीत. विविध प्रकारची एकूण २९०० कोटी रुपयांची देणी एसटीकडून पुरवठादार व इतरांना देय राहीली असून थकीत आहेत. आता आचार संहिता संपल्यावर सुद्धा सरकार दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार नसेल तर हे दुर्दैवी आहे. निवडणुकीत एवढे यश मिळाले असताना सरकार अजूनही एसटीला मदत करीत नसून एसटी सक्षम करण्याच्या फक्त गप्पा मारल्या जात आहेत असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *