मुंबई :
५१ वी आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरिय कब्बडी स्पर्धा. कै. एम. एन. वर्मा फिरता चषक व कै. श्री. सुमती अंकूश मालकर फिरता चषक स्पर्धेसाठी झालेल्या अंतिम सामन्यात मुलांमध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने व मुलींमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालयाने (ब संघ) विजेतेपद मिळवले.
मुलांच्या अंतिम सामन्यात डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने एस.एस.टी. महाविद्यालयाचा २४-२० असा ४ गुणाने पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या सामन्यात आंबेडकरच्या आकाश साळवी, जितेंद्र यादव यांनी चढाई मध्ये चमकदार कामगिरी केली व सनी भगतने उत्कृष्ट पकड करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. तर पराभूत एस.एस.टी. च्या चीन्मय गुरख, रोहन कनोजीया यांनी चढाई मध्ये व सिद्धेश पांचाळने छान पकड करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी जोरदार संघर्ष केला मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
मुलींच्या अंतिम सामन्यात महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या ब संघाने त्यांच्याच म्हणजे महर्षी दयानंद महाविद्यालयाचा (अ संघ) २८-२६ असा दोन गुणांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात महर्षी दयानंदच्या रिया मडकईकर, नेहा गुप्ता यांनी सामन्यात जोरदार कामगिरी करत विजय खेचून आणला तर उपविजेत्या महर्षी दयानंदच्या (अ संघ) रितीका फूलसुर्गे, अदिती शिंदे, उर्जा साळगावकर यांनी दिलेली लढत पराभवापासून वाचवू शकली नाही.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ संजय निकम (एसीपी, राज्य इंटेलिजेंट विभाग, मुंबई), सचिन कदम (पी. आय. भोईवाडा पोलिस स्टेशन), माया आक्रे (कबड्डी -अर्जुन पुरस्कार), डॉ. हेमंत शर्मा (प्राचार्य, महर्षी दयानंद महाविद्यालय), जीवन पैलकर (राष्ट्रीय कबड्डीपटू, एन.आय.एस. प्रशिक्षक), श्री.मनोज पाटील (क्रीडा संचालक), प्रताप परब (क्रीडा भारती कार्यवाह, मुंबई), बाळ तोरसकर (सह सेक्रेटरी, महाराष्ट्र खो खो असो., सेक्रेटरी इनडोअर क्रिकेट असो.) डॉ. प्रताप कामठेकर (अकाऊंट विभाग पोदार महाविद्यालय), प्रा. बी. टी. निकम (महर्षी दयानंद महवियालय), मेजर अशोक कुवर, पंडित पाटील, प्रकाश भामरे, रमेश लांबे, वैशाली पाटील, राजेश पाडावे, डॉ. यू. सी. शुक्ला (उप प्राचार्य, म. द.महा.), प्रा. अॅड. एम. कुराडे, प्रा. गणेश गव्हाणे आदी मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
मुंबई, महर्षी दयानंद महाविद्यालयातर्फे ४२ वी आंतर महाविद्यालयीन खो-खो स्पर्धा मनोरंजन मैदान, पेरू कंपाउंड, लालबाग येथे पार पडली. या स्पर्धेत मुलांचे विजेतेपद झुनझुनवाला महाविद्यालयाने तर मुलींचे विजेतेपद एस. एस. टी. महाविद्यालयाने मिळवले. या बक्षीस समारंभाचे सूत्रसंचलन प्रा. एन. माने यांनी तर मनोज पाटील प्रास्तविक आणि आभार प्रदर्शन केले.