मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र हिवाळी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीएमएस आणि बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स सत्र पाचचा निकाल जाहीर करण्यात आला असून अवघ्या २२ दिवसात हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
तृतीय वर्ष बीएएम सत्र पाच साठी एकूण १४,७६२ एवढे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते, त्यापैकी १४,५४५ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ११,५१२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.२१ एवढी आहे. तर तृतीय वर्ष बीकॉम अकाऊंटिंग अँड फायनान्स सत्र पाच साठी ८,७०१ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८,५३६ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ६,०५२ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ७०.९२ एवढी आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल मुंबई विद्यापीठाच्या https://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून हिवाळी सत्र २०२४ च्या या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी जलद मूल्यांकन करून सहकार्य केल्याबद्दल या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी आभार मानले.