क्रीडा

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; भारत-नेपाळमध्ये उद्घाटनाचा थरार

नवी दिल्ली :

जग पहिल्या ऐतिहासिक खो-खो विश्वचषकाचा थरार अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहे. १३ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत पुरुष व महिलांचे ३९ संघ चुरशीचा खेळ करत विजेतेपदावर दावा करणार आहेत. या स्पर्धेने खो-खोला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळणार आहे. पुरुष गटाचा सलामीचा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात होणार आहे तर महिलांचा सलामीचा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सांगणार आहे.

महिला गटातील सलामीचा सामना १४ जानेवारी रोजी सकाळी ११:४५ वाजता इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय महिला संघाचा पहिला सामना १४ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता दक्षिण कोरियाविरुद्ध होईल. गटातील साखळी फेरीचे सामने १६ जानेवारीपर्यंत खेळले जातील. तर बाद फेरीचे म्हणजे उपांत्यपूर्व फेरीचे सामने १७ जानेवारीपासून सुरू होईल आणि महिलांचा अंतिम सामना १९ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजता खेळवला जाईल तर पुरुषांचा अंतिम सामना रात्री ८:१५ वाजता रंगेल.

स्पर्धा स्वरूप :

प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल.

खो-खोचा जागतिक प्रवास :

ही ऐतिहासिक स्पर्धा खो-खोला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारी ठरणार असून  भारताच्या सांस्कृतिक वारशाचा आणि साहसी खेळाला प्रेक्षकांसमोर सदर करेल. इंदिरा गांधी स्टेडियमवर होणाऱ्या या स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यांची मेजवानी प्रेक्षकांसाठी सज्ज आहे.

उद्घाटन आणि प्रसारण :

१३ जानेवारीला रंगणार्‍या उद्घाटन सोहळ्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्यातील सलामीचा सामना रात्री ८:३० वाजता होणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील स्टार स्पोर्ट्स १ HD आणि स्टार स्पोर्ट्स फर्स्ट वाहिन्यांवर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होईल, तर दूरदर्शन प्रादेशिक स्तरावर देशभरात कव्हरेज देणार आहे. डिस्ने+ हॉटस्टार डिजिटल प्लॅटफॉर्मवर थेट प्रवाहाची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

संघ विभाजन आणि महत्त्वाचे सामने

पुरुष गटात २० संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:

  • गट अ : भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
    गट ब : दक्षिण
  • आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
  • गट क : बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
  • गट ड : इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला गटात १९ संघ चार गटांमध्ये विभागले गेले आहेत:

  • गट अ : भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
  • गट ब : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
  • गट क : नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
  • गट ड : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *