मुंबई :
मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्र हिवाळी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बीएस्सी आणि बीएस्सी आयटी तृतीय वर्ष सत्र ५ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीएस्सी सत्र ५ या परीक्षेसाठी एकूण ६८७९ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी ६७०४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत ४२४५ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ६३.३५ एवढी आहे.
बीएस्सी आयटी सत्र ५ या परीक्षेसाठी १०६८३ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी १०५८४ एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेत ७३७७ एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ६९.८२ एवढी आहे. या दोन्ही परीक्षांचे निकाल २१ दिवसात जाहीर करण्यात आले.
या दोन्ही परीक्षेंचे निकाल मुंबई विद्यापीठाच्या https://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हिवाळी सत्र २०२४ च्या या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी परीक्षा विभागाने सुक्ष्म नियोजन केले होते. परीक्षा संपल्यापासून ते जलदगतीने मूल्यांकन करून सहकार्य केल्याबद्दल या प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांनी आभार मानले.