शहर

ओला, उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी गाड्यांसाठी नियम बनवले तरी बेइमानी होणारच – श्रीरंग बरगे

रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या दूर करायच्या असतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केली पाहिजे

मुंबई : 

ओला , उबेर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावलीत आणण्याचानवे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी घातक ठरणारा असून अशी वाहने आर. टी. ओ. ने घालून दिलेल्या नियमांचे कधीच पालन करीत नसून बेइमानी करीत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.त्या मुळे या विषयात सरकारने फार लक्ष न देता एसटी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्या पाहिजेत. रोजगार निर्मिती, व वाहतूक समस्या समूळ नष्ट करायच्या असतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची गरज असल्याचे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश नवे परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले असून त्या संदर्भात आपले मत बरगे यांनी नोंदवले आहे.

राज्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच शासकीय नियमनात आणण्यासंदर्भात काल मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वरिष्ठ शासकीय अधिकारी व प्रवासी वाहतुक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. असाच प्रयोग जुलै २२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा झाला होता. त्या साठी एक समिती गठीत करण्यात आली होती. पण त्या वेळी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सर्व कामगार संघटना व अभ्यासकांनी याला विरोध केला होता. आताही सर्व कर्मचारी संघटना व इतर संबंधित यांना एकत्र करून या सरकारच्या या संकल्पनेला विरोध केला जाईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

रोजगार निर्मिती व वाहतूक समस्या हे उद्देश सफल होणार नाही

वाहतूक समस्या , खाजगी प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या परिवहन नियमा अंतर्गत सर्व खाजगी वाहतूकदाराना एकत्रित आणून प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्याचा सरकरचा उद्देश सफल होणार नसून वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश केल्यास ते सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत नाहीत. हे यापूर्वीच सिद्ध झाले असून सर्वात जास्त अपघात हे खाजगी गाड्यांचे झालेले आहेत.हे आकडेवारीतून सिद्ध झाले आहे. त्याच प्रमाणे एसटी स्टँडच्या २०० मिटर आजूबाजूला अशा प्रकारच्या गाड्याना बंदी असताना व टप्पे वाहतुकीस परवानगी नसतानाही त्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. हेही आपण दररोज पाहत आहोत. बाईक चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, अशा परिवहन मंत्री सरनाईक यांनी या वेळी दिल्या असून एसटीमध्ये चालक वाहक व यांत्रिकी पदावर अनेक महिला काम करीत असून एसटीच्या गाड्या वाढविल्यास त्यातूनही रोजगार निर्मिती व महिलांना रोजगार देण्याचा सरकारचा उद्देश सफल होईल असेही बरगे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *