शहापूर :
शहापूर तालुक्यातील टाकी पठार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत चक्क मुख्याध्यापक एका अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. तथाकथित मुख्याध्यापकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून वासनांध मुख्याध्यापकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.,
शहापूर तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा टाकीपठार येथील अकरावीच्या विद्यार्थिनीची शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून सदर मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यास किन्हवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
१८ जानेवारी रोजी टाकीपठार आश्रम शाळेत इयत्ता अकरावीत शिकणारी विद्यार्थीनी लेझीम खेळून रूममध्ये आली असता त्या ठिकाणी तिच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांनी विनयभंग केला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने सदरचा प्रकार तिच्या आई-वडिलांना सांगितला. तिच्या आई-वडिलांनी तडक किन्हवली पोलीस स्टेशन गाठत मुख्याध्यापक प्रभाकर जाधव यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून मुख्याध्यापक प्रभाकर जाधव याला किन्हवली पोलिसांनी अटक केली आहे. असे काही प्रकार या अगोदरही घडले आहेत का याची देखील चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले.