मुंबई :
शिवाजी पार्क जिमखान्याच्या वतीने ८ ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान १६ व्या शिवाजी पार्क जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेत पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन विभागात ही स्पर्धा संपन्न होणार आहे.
विजेत्यांना १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या www.maharashtracarromassociation.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनकडे नावे नोंदविण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२५ असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेशी संपर्क साधावा.