
मुंबई :
मॉग्सची ५३ वी वार्षिक परिषद शनिवार ८ व ९ मार्च २०२५ रोजी जिओ वर्ल्ड कन्वेक्शन सेंटर बीकेसी येथे संपन्न होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन मॉग्सच्या अध्यक्षा डॉक्टर सुवर्णा खाडीलकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. ह्या परिषदे मध्ये “श्रीमती सुनंदा व कै वसंत खाडिलकर जीवनगौरव पुरस्कार” हा नवीन पुरस्कार प्रदान केला जाईल.
खाडिलकर कुटुंबातील सर्व डॉक्टर सुवर्णपदक विजेते आणि विद्यापीठातील टॉपर्स आहेत. सुनंदा व वसंत खाडिलकर यांचा विश्वास व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासावर व सामाजिक सेवेवर होता. त्यानुसार कुटुंबातील सर्वांनी विविध क्षेत्रात उत्कृष्टता साधली. खेळ, वक्तृत्व चित्रकला गायन आणि इतर क्षेत्रांमध्ये अनेक पदकं जिंकली. म्हणूनच त्यांच्या नावाने हा जीवन गौरव पुरस्कारासाठी डॉ. सुवर्णा खाडिलकर यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. सुवर्णा खाडिलकर या मॉग्सच्या अध्यक्षा म्हणून या सर्व निकषांवर खऱ्या उतरतात.
अति जोखमीची प्रसूती, स्त्री रोग एनडोक्राइनोलॉजी, प्रजनन आरोग्य, पर्याय आणि आव्हाने व इतर या थीमवर आधारित ही परिषद असणार आहे. यामध्ये गर्भावस्थेतील किंवा प्रसूतीच्या काळात ज्या महिलांना उच्च धोका असतो, जसे की गर्भाशयाशी संबंधित समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह, किंवा इतर कोणतीही जटिलता, त्यांना ‘उच्च धोका प्रसूती’ असे संबोधले जाते. तसेच स्त्रीरोग एंडोक्रायनोलॉजी या क्षेत्रामध्ये महिला शरीराच्या हार्मोनल सिस्टिमच्या आजारांचा अभ्यास केला जातो, विशेषतः हार्मोनसंबंधी रोग, मासिक पाळीचे विकार, गर्भधारणेच्या समस्यांसारख्या परिस्थितींचे उपचार आणि प्रजनन आरोग्य, पर्याय आणि आव्हाने – या टर्मचा अर्थ महिला आणि पुरुषांच्या प्रजनन संबंधित आरोग्य आणि उपायांचा विचार करणे, तसेच त्यांच्याशी संबंधित आव्हाने. उदाहरणार्थ, गर्भधारणेसंबंधी आव्हाने, प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर, स्त्री-पुरुष आरोग्य, वयाच्या आधारावर प्रजनन क्षमता आणि इतर संबंधित समस्यांचा समावेश होतो. तसेच इतर पुनरुत्पादनाशी संबंधित समस्या. या Obstetric and gynecology च्या तीन महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित केले जाऊन त्यावर अभ्यासात्मक चर्चा आणि मार्गदर्शन केले जाणार आहे, असे जी. टी. वैद्यकीय महाविद्यालयाचे उप अधिष्ठाता आणि कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे आस्क द एक्सपर्ट्स या सेशनमध्ये डॉक्टर तुषार पालवे हे मेडिको लीगल इशूज आणि आय व्ही एफ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदे दरम्यान डॉ. बी. एन. पुरंदरे आऊटस्टँडिंग सर्विस अवॉर्ड, गेस्ट लेक्चर, की नोट ऍड्रेस, पॅनल डिस्कशन, आस्क द एक्सपर्ट्स, डॉक्टर रिश्मा पै पर्सनॅलिटी ऑफ द इयर अवॉर्ड, कल्चरल प्रोग्राम (रॅम्प वॉक आणि वॉक फॉर कॉज), फिलिसिटेशन ऑफ न्यू पेट्रोन्स इत्यादी कार्यक्रमाचा समावेश असेल. या परिषदे मधे सहभाग घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.