
खारघर :
महाबोधी महाविहार बचाव समिती, खारघर यांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आणि प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्त समस्त बौद्ध बांधव खारघर, नवी मुंबईच्या वतीने शनिवार, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी, सायंकाळी ४ वाजता भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरुवात उत्सव चौक येथून सुरू झाली आणि समाप्ती तथागत महाविहार सेक्टर – १२, खारघर येथे करण्यात आली.
बोधगया महाविहार कायदा १९४९ रद्द करावा आणि बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण केवळ बौद्धांच्या ताब्यात असावे. या प्रमुख मागण्यांसाठी भव्य शांतता रॅली काढण्यात आली. तथागत महाविहारात बुद्ध वंदना घेऊन भंते प्रज्ञावंत यांनी बुद्धगया महाबोधी महाविहार आंदोलना विषयी सविस्तर अशी ऐतिहासिक माहीती दिली. तसेच भंते धम्मराज महाथेरो यांनी सम्राट अशोक जयंती निमीत्त सविस्तर मार्गदर्शन केले. ईतर दहा भिक्खु भिक्खुनिंनी सर्वांना आशिर्वाद देऊन धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
या भव्य शांतता रॅलीमध्ये खारघरमधील प्रबुद्ध महिला सामाजिक संघ, भारतीय बौद्ध महासभा, तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ, घरकुल, पंचशील बुद्ध विहार कमिटी, बौद्धजन पंचायत समिती, तथागत महाविहार सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संस्था, २२ प्रतिज्ञा अभियान, धम्म उपासिका संघ,बहुजन विद्यार्थी परिषद, खारघर रिफॉर्मिस्ट फाउंडेशन, युगंधर बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि सामाजिक संस्था, डी. बी. ए. व्हि. एम. , डॉ .बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती स्पेगेटी, डॉ .बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती वास्तुविहार, डॉ .बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती सेलेब्रेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती स्वप्नपुर्ती, डॉ .बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती व्हॅलीशील्प तसेच संपूर्ण खारघर, बेलापुर, सीवुड, नेरुल, कामोठे, पनवेल मधिल बौद्ध समाज यांच्या सहभागाने ही भव्य शांतता रॅली उत्साहात संपन्न झाली. ५०० ते ६०० बौद्ध उपासक – उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भव्य शांतता रॅलीचे आयोजन खारघर बौद्ध समाजाने केले होते.