क्रीडा

एम.सी.एफ. राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत प्राजक्ता – घुफ्रान विजेते 

मुंबई : 

मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन बोरिवली आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली यांच्या सहयोगाने १० व्या एमसीएफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने ठाण्याच्या पंकज पवारला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२५, १८-११ व २५-९ असे पराभूत करून विजेतेपद संपादन केले आणि रुपये २५ हजारांची कमाई केली. फार्मात असलेल्या पंकजने पहिल्या सेटमध्ये सहाव्या बोर्डात व्हाईट सलामीची नोंद करत पहिला सेट सहज जिंकला होता. परंतु संयमी खेळाच्या जोरावर पुढील दोनही सेट घुफ्रानने जिंकून आपली ताकद दाखवून दिली.

हेही वाचा : कुर्ला केंद्रावरील एमएचटी सीईटी परीक्षा रद्द; ६९ विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा

अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या घुफ्रानने उपांत्य लढतीत पुण्याच्या सागर वाघमारेवर १३-२५, २५-१४ व २२-१२ अशी तर पंकजने मुंबईच्या प्रफुल मोरेवर २१-७, २५-१० अशी मात केली होती. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत विजय मिळवताना सागर वाघमारेने मुंबईच्या प्रफुल मोरेविरुद्ध पहिला सेट २३-१५ असा गमावला होता. मात्र पुढील दोन ही सेट त्याने २३-२०, २५-५ असे जिंकले.

हेही वाचा :मधुमेहाच्या औषधाच्या किमतीत ९० टक्क्यांनी घट, देशातील ११ कोटींहून अधिक रुग्णांना दिलासा

महिला एकेरीच्या अंतिम लढतीत आपले पहिले राज्यस्तरीय विजेतेपद पटकावताना मुंबई उपनगरच्या प्राजक्ता नारायणकरने मुंबईच्या अंबिका हरिथवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १४-११, ७-२५ व १९-१७ असा निसटता विजय प्राप्त केला आणि रोख रुपये ८ हजारांचे ईनाम काबीज केले. प्राजक्ताने उपांत्य लढतीत मुंबईच्या मिताली पाठकवर २०-१७, १९-२१, १८-१३ असा चुरशीचा विजय मिळवला होता. तर अंबिका पालघरच्या श्रुती सोनवणेवर २०-१७, १८-१५ अशी सरळ मात केली होती. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मितालीने बाजी मारली. तिने श्रुतीला २५-१२, १०-१६ व २५-११ असे हरवले. पुरुष एकेरी गटाच्या अंतिम फेरीत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने ठाण्याच्या पंकज पवारला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत ६-२५, १८-११ व २५-९ असे पराभूत करून विजेतेपद संपादन केले आणि रुपये २५ हजारांची कमाई केली. पुरुषांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत सागर वाघमारेने विजय मिळवला.

विजेत्या खेळाडूंना एमसीएफचे मानद अध्यक्ष सी. ए. निहार जांबुसराइया, मानद सचिव ऍड. सतिश शर्मा, उपाध्यक्ष चंद्रकांत लालन, माजी अध्यक्ष हरीश छेडा, कार्यकारिणी सदस्य हेमल शहा राज्य कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य महर्षी देसाई यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *