
जम्मू आणि काश्मीरमधील (Pahalgam) पहलगाम येथे झालेल्या मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 25 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानविरुद्ध यानंतर भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची गंभीर दखल घेत दहशतवाद्यांना गर्भित इशारा दिला आहे.
‘प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल. कोणी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाणार आहे. दहशतवाद्यांची सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आता आली आहे’, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी बिहारमध्ये पोहोचले आहेत. त्यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त मधुबनी येथे एका जाहीरसभेला संबोधित केले. यामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे शांत राहून आणि नंतर त्यांचे भाषण सुरू केले. ते म्हणाले, प्रत्येक दोषीला कठोरातील कठोर शिक्षा मिळेल. कोणी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दिली जाणार आहे.
दहशतवाद्यांची सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आता आली आहे. यातील जखमी पर्यटकांच्या उपचारांसाठी सरकार खर्च करणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे कोट्यवधी भारतीय दु:खी झाले आहेत. आता सगळी आश्रयस्थानं नष्ट करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांनी भारतीय आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. आता दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याची वेळ आल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
डोकेदुखी वारंवार का होते ते चला जाणून घेऊया..
पंचायतींना सक्षम करण्यासाठी महत्वाची पावले उचलली
देशातील पंचायती राज संकल्पनेमागील हीच भावना आहे. गेल्या दशकात, पंचायतींना सक्षम करण्यासाठी एकामागून एक पावले उचलली गेली आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पंचायतींनाही बळकटी मिळाली आहे. पंतप्रधान मोदींनी डिजिटल होण्याचे फायदेही यावेळी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर देशाला नवीन संसद भवन मिळाले
जमिनीच्या कागदपत्रांचे डिजिटायझेशन हे वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्वातंत्र्यानंतर देशाला नवीन संसद भवन मिळाले आणि 30 हजार नवीन पंचायत इमारतीही बांधल्या गेल्या, असे ते म्हणाले. सरकारचे प्राधान्य ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देणे होते, ज्यामुळे गावांचा विकास झाला.