
मुंबई :
आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट परिवहन विभागाला तिकीट दरात वाढ (Bus Fares) करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिली. त्यानंतर रिजनल ट्राफिक अँथोरेटीने अप्रत्यक्ष तिकीट दर वाढीला मंजुरी दिल्याने पुढील आठवड्यापासून प्रवाशांना तिकीट दर वाढीला सामोरे जावे लागणार आहे.
स्वस्त व आरामदायी प्रवास म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसचा प्रवास महागला आहे. बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्यास मुंबई महापालिका प्रशासनाने मंजुरी दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी रिजनल ट्राफिक अँथोरेटीकडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला असता बुधवारी मंत्रालयात रिजनल ट्राफिक अँथोरेटी आणि बेस्ट उपक्रमाची बैठक पार पडली. या बैठकीत बेस्ट बसेसच्या तिकीट दरात वाढ करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.
परंतु मिनिट्स बनवण्यासाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने बुधवारी रिजनल ट्राफिक अँथोरेटीने तिकीट दर वाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही. परंतु पुढील एक ते दोन दिवसांत रिजनल ट्राफिक अँथोरेटीची बेस्ट बस तिकीट दर वाढीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी होणार असल्याचे सांगण्यात आले. रिजनल ट्राफिक अँथोरेटीची स्वाक्षरी झाल्यानंतर तिकीट मशीन मध्ये काहीसा बदल करणे, कम्प्युटरवर अपडेट करणे बाकी आहे. त्यामुळे सोमवार ५ मे नंतर प्रवाशांना तिकीट दर वाढीचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.
स्वच्छ मुंबईसाठी, एक छोटा बदल पुरेसा आहे!
अशी असेल तिकीट दर वाढ –
विना वातानुकूलित बसेसचे भाडे
कि.मी सध्याचे भाडे – वाढीव भाडे
५ — ५ रुपये — १० रुपये
१०— १० रुपये– -१५ रुपये
१५— १५ रुपये — -२० रुपये
२०— २० रुपये– -३० रुपये
२५— २० रुपये – – – ३५ रुपये
वातानुकूलित बसेसचे भाडे
कि.मी सध्याचे भाडे – वाढीव भाडे
५ — – ६ रुपये — -१२ रुपये
१०— १३ रुपये – – – २० रुपये
१५— १९ रुपये — -३० रुपये
२०— २५ रुपये – – – ३५ रुपये
२५— २५ रुपये — -४० रुपये