
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने वाशी येथे सुरु असलेल्या ५० व्या सिनियर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या महिला सांघिक गटात मुंबई संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाने ठाणे संघावर २-१ असा चुरशीचा विजय मिळविला.
पहिल्या एकेरीच्या सामन्यात मुंबईच्या रिंकी कुमारीने ठाण्याच्या मधुरा देवळेवर २५-८, २५-५ असा सहज विजय मिळवून संघाला आघाडी मिळवून दिली. तर दुसऱ्या एकेरीच्या सामन्यात ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने मुंबईच्या मिताली पाठकवर २५-५, २५-४ असा विजय मिळवत सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक दुहेरीच्या सामना तिसऱ्या सेटपर्यंत गेला. तिसऱ्या सेटच्या सातव्या बोर्डानंतर दोनही जोडीचे १७-१७ असे समान गुण झाले होते.
आठव्या आणि निर्णायक बोर्डाची सुरुवात करण्याची संधी मुंबईच्या आयेशा साजिद खानकडे होती. मात्र ठाण्याने राणी घेतल्यामुळे सामन्यातील चुरस अधिक वाढली. परंतु गमावल्यानंतही ३ गुणांचा बोर्ड घेत मुंबईने या गटावर आपले वर्चस्व सिद्ध केले. या सामन्यात मुंबईने ठाण्यावर २४-१२, ५-१८ व २०-१७ असा निसटता विजय मिळविला. तिसऱ्या क्रमांकासाठी पालघर, पुणे आणि रत्नागिरी या तीनही संघांचे प्रत्येकी २ असे समान गुण झाले होते. परंतु सरासरी गुण कोष्टकाच्या आधारे पालघर संघास विजयी घोषित करण्यात आले.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.
इक्बाल बागवान ( कोल्हापूर ) वि वि स्वप्नीलराजे शिंदे ( रत्नागिरी ) २२-६, २५-०
फैझुल मोमीन ( सांगली ) वि वि प्रवीण मढवी ( ठाणे ) २४-९, २५-०
मेहराज शेख ( नाशिक ) वि वि दत्तप्रसाद शें बकर ( ठाणे ) १८-८, २५-१
बिपीन पांडेय ( पालघर ) वि वि किरण बोबडे ( ठाणे ) २४-१९, २५-१
वयस्कर एकेरी चौथ्या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
संदेश अडसूळ ( मुंबई ) वि वि श्रीधर वाघमारे ( रायगड ) २२-१०, २५-१०
बाळकृष्ण लोखरे ( पुणे ) वि वि विश्वनाथ शिवलकर ( रत्नागिरी ) २५-६, २०-७
निरंजन चारी ( पालघर ) वि वि गणेश पाटणकर ( मुंबई ) २५-१२, २२-८
रघुनाथ वाघपंजे ( मुंबई उपनगर ) वि वि रवींद्र बच्चलवार ( मुंबई ) २५-५, २५-५