शहर

म्हाडातर्फे मुंबई शहर बेटावरील ९६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर

मुंबई :
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ९६ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या ९६ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या २ इमारतींचा समावेश आहे.

या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये २५७७ निवासी व ५८५ अनिवासी असे एकूण ३१६२ भाडेकरू/रहिवासी आहेत. मंडळातर्फे १८४ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटिस बजावण्यात आली आहे. नोटिस बजावलेल्या भाडेकरू / रहिवासी यांच्यापैकी ०३ निवासी भाडेकरू/रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. नोटिस देऊनही गाळे खाली न केलेल्या निवासी गाळ्यांची संख्या १७६ आहे. मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीनुसार एकाही निवासी भाडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निवार्‍याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु /रहिवासी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच २५७७ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.

अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या परिजनांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या ९६ अतिधोकादायक इमारती

१) ३० सी-३० डी , बोमनजी लेन
२) १२०, बोरा बाजार स्ट्रीट
३) ९६-९६ अ, अली उमर स्ट्रीट
४) ५९-६१, निजाम स्ट्रीट
५) १५-२७, निजाम स्ट्रीट
६) २३, बोरा स्ट्रीट
७) इमारत क्रमांक ५९, दादी सेट अग्यारी लेन (सी-३९२१)
८) इमारत क्रमांक ३५२-३५४, काळबादेवी रोड (सी-१८६८-६९)
९) इमारत क्रमांक १२८-१३२, केव्हल स्ट्रीट (सी -३७३५)
१०) इमारत क्रमांक ४०-४६, पिकेट रोड (सी-९१४)
११) १८ के एम शर्मा मार्ग सी-२०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५
१२) इमारत क्रमांक ४७-५७ सी.पी. टॅंक रोड
१३) इमारत क्रमांक ५, दुसरी सुतार गल्ली
१४) इमारत क्रमांक ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट
१५) ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव, मुंबई- ४००००४
१६) १६-२२ एक, खत्तर अली लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१७) ११-१३, एम के रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
१८) ५ डी,‌ दुभाष लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१९) ३१६-एबी, ११, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२०) २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२१) १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव, मुंबई – ४००००४
२२) १३०-बी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२३) १३० ए, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२४) ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२५) ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२६) १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२७) १२, (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२८) २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२९) २१३-२१५, डॉ. डी बी मार्ग राजा टेरेस (मागील वर्षीच्या यादीतील)
३०) १, खेतवाडी बारावी लेन, वाघेला कोपर (मागील वर्षीच्या यादीतील)
३१) २४-२६-२८-३०, फकीर महल, खेतवाडी बँक रोड
३२) २२, मातृ वंदना, खेतवाडी सहावी लेन
३३) ९-११, कुपर भवन, खेतवाडी पाचवी लेन
३४) १-३, चंद्राभवन, खेतवाडी पाचवी लेन
३५) १२, फकरी मंझिल, शंकर शेठ लेन
३६) ११-१३-१५, पडोल बिल्डिंग, दोराबजी मिठाईवाला लेन
३७) ५२ ई-५४, यूनियन बिल्डिंग, नौशिर भरूचा मार्ग
३८) ३५२ ए, एम.एस. अली रोड
३९) १७१, फॉकलंड रोड व २८६, एम एस अली रोड
४०) ११४-ए, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४१) ११४-बी, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४२) ११४-११६, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४३) १९ बी, फितवाला चाळ जयराज भाई लेन
४४) १९ सी, हकीम दयाल चाळ,जयराज भाई लेन
४५) १६, न्यू हनुमान बिल्डिंग, शामराव विठ्ठल मार्ग
४६) २-८, पाव वाला स्ट्रीट
४७) २-८, न्यू हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन
४८) १०-१२, हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पह…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *