आरोग्य

३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांमधील मेंदुज्वराच्या प्रकरणांमध्ये वाढ

मुंबई :

मुलांमध्ये एन्सेफलायटीस (मेंदुज्वर) प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसून येत आहे, विशेषतः महाराष्ट्रात, जिथे लहान मुलांमध्ये अशी अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या संभाव्य जीवघेण्या स्थितीमुळे गंभीर न्यूरोलॉजिकल गुंतागुंत, मुलांच्या विकासात विलंब आणि ज्या प्रकरणांमध्ये निदान आणि उपचारास विलंब झाला तर मृत्यू ओढावू शकतो.

एन्सेफलायटीस ही मेंदूला येणारी सूज आहे, जी बहुतेकदा हर्पस सिम्प्लेक्स, गोवर किंवा जपानी एन्सेफलायटीस (जेई) विषाणूजन्य संसर्गामुळे होते. क्वचित प्रसंगी, हे बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गामुळे आणि अगदी स्वयंप्रतिकार प्रतिक्रियेमुळे देखील उद्भवू शकते. त्यांच्या विकसित होणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे, 3 ते 6 वयोगटातील मुले या स्थितीला विशेषतः असुरक्षित असतात. प्रभावी उपचार आणि सुधारित परिणामांसाठी एन्सेफलायटीसची प्रकरणं वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनी तीव्र ताप, उलट्या, गोंधळ उडणे किंवा वर्तणुकीत झालेले बदल, आकडी, तीव्र डोकेदुखी, प्रकाशाची संवेदनशीलता, तंद्री लागणे किंवा सुस्ती येणे आणि संवेदना कमी होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. लहान मुलांमध्ये याव्यतिरिक्त जास्त रडणे आणि चिडचिड करणे, मान कडक होणे, त्वचेवर पुरळ, बोलण्यात होणारा बदल आणि फॉन्टानेल (कवटीचा मऊ भाग) फुगणे यांचा समावेश असू शकतो. निदानाकरिता सामान्यतः सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडची चाचणी करणे आणि मेंदूचे एमआरआय स्कॅन केले जाते अशी माहिती डॉ. संजू सिदाराद्दी(बालरोगतज्ञ आणि नवजात तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई) यांनी दिली.

पूर्णा रेल्वे स्थानकाचे निकृष्ट बांधकाम उघड; गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीचा संशय

डॉ. वृक्षल शामकुवार ( बालरोगतज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई) सांगतात की, एन्सेफलायटीस असलेल्या मुलांमध्ये जास्त झोप येणे, चिडचिड होणे, यासारखी लक्षणे दिसू शकतात. प्रतिसाद न देणे, जेवण्यास नकार देणे आणि बोलण्यात अडचणी येणे अशा लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.

डॉ. संजू सिदाराद्दी पुढे सांगतात की, गेल्या दोन महिन्यांत, उलट्या, गोंधळ, तीव्र डोकेदुखी असलेल्या ३ ते ६ वयोगटातील ५ ते ६ मुलांवर मेंदूज्वरावर उपचार करण्यात आले जेणेकरून न्यूरोलॉजिकल समस्या, विकासात्मक विलंब (शिकणे, विचार करणे, बोलणे किंवा हालचाल) यासारख्या गंभीर गुंतागुंत टाळण्यासाठी अचुक उपचार करण्यात आले. वेळीच उपचार करणे जीवनरक्षक ठरते. वेळीच उपचार घेतलेल्या मुलांमध्ये बरे होण्याची शक्यता अधिक असते. उपचारास झालेल्या विलंबामुळे कायमचे न्यूरोलॉजिकल नुकसान, शिकण्यात व समजण्यात अडचणी आणि मृत्यू देखील ओढावू शकतो. उपचारांमध्ये सामान्यतः अँटीव्हायरल औषधे, आयव्ही आणि गंभीर प्रकरणांमध्ये अतिदक्षता विभागात उपचारांचा समावेश असतो. एन्सेफलायटीस, विशेषतः जपानी एन्सेफलायटीस, रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण. जेई हा लसीकरणाद्वारे प्रतिबंधित करता येणारा आजार आहे. पालकांनी त्यांच्या मुलांना शिफारस केलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण केले पाहिजे. जेई लस सहसा दोन डोसमध्ये दिली जाते. लसीकरणाव्यतिरिक्त, डासांचे नियंत्रण अत्यंत महत्वाचे आहे, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा डासांची संख्या वाढते. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये मच्छरदाण्या आणि रिपेलेंट्स वापरणे, स्वच्छता राखणे आणि गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी जाणे टाळणे याचा समावेश आहे.

लसीकरण आणि उपचार पर्याय उपलब्ध असूनही, अनेक पालकांमध्ये जागरूकतेचा अभाव दिसून येतो. वेळीच निदान आणि प्रतिबंधाचे महत्त्व कुटुंबांना कळविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य मोहिम आणि याबाबत योग्य शिक्षण आवश्यक आहे. पालकांनी आपल्या मुलांमध्ये तीव्र ताप किंवा अचानक वर्तणुकीतील बदल यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. एन्सेफलायटीसचे रुग्ण वाढत असताना, विशेषतः लहान मुलांमध्ये, या गंभीर संसर्गाचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी, वेळीच उपचार आणि सामुदायिक जागरूकता यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असेही डॉ. संजू सिदाराद्दी यांनी अधोरेखित केले.

सर्वोत्तम परिणामांसाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत, मेडिकव्हर हॉस्पिटलने ३ ते ६ वयोगटातील मुलांमध्ये एन्सेफलायटीसच्या १-२ प्रकरणांवर उपचार केले आहेत. फिजीओथेरेपी, स्पीच थेरेपी हे पुनर्प्राप्तीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वेळीच आणि अचुक उपचारांनी जीवनाची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारते अशी माहिती डॉ. वृक्षल शामकुवार यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *