शिक्षण

एमएचटी सीईटीचा निकाल १६ व १७ जून रोजी

मुंबई :

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीच्या परीक्षेचा निकाल १६ व १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम गट) गटाचा निकाल १६ जून तर भौतिकशास्त्रक, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी गट ) गटाचा निकाल हा १७ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांपैकी महत्त्वाची परीक्षा असलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल दोन टप्प्यात जाहीर करण्यात येणार आहे. १६ जून रोजी पीसीएम या गटाचा निकाल तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १७ जून रोजी पीसीबी गटाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ९ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान पीसीबी गट आणि १९ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान पीसीएम गट अशी दोन टप्प्यात २८ सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात आली. यामध्ये पीसीबी गटासाठी ३ लाख १ हजार ७२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ८२ हजार ७३७ उमेदवार परीक्षेला बसले होते. त्याचप्रमाणे पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख २२ हजार ८६३ उमेदवार परीक्षेला बसले हाेते. एमएचटी सीईटीची परीक्षा १८१ केंद्रांवर घेण्यात आली. त्यातील १७२ केंद्रे राज्यात होती. तर नऊ केंद्र राज्याबाहेर होती. एमएचटी सीईटी २०२५ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी पीसीबी गटातील उमेदवारांसाठी १८ मे २०२५ रोजी आणि पीसीएम गटासाठी २१ मे रोजी सूचनेद्वारे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर आक्षेप नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटाचे निकाल हे www.mahacet.org आणि www.mahacet.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *