शिक्षण

11th admission : अकरावी प्रवेशाची सायंकाळी ५ वाजता जाहीर होणार पहिली गुणवत्ता यादी

मुंबई :

वारंवार पुढे ढकलण्यात येत असलेली अकरावी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शनिवारी दुपारी शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले. त्यानुसार पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना सोमवारपासून प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले होते.

संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच राबविण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे २६ जून २०२५ रोजी पहिल्या फेरीसाठी यादी जाहीर करण्यात येणार होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालयामधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे संगणक प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यासाठी २६ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असताना शिक्षण संचालनालयाने शनिवारी दुपारी अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार शनिवारी सायंकाळी ५ वाजता अकरावी प्रवेशाची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच ३० जून ते ७ जुलै या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील ९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले.

दरम्यान, अकरावी प्रवेशाची २६ जून रोजी जाहीर होणारी गुणवत्ता यादी न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र शिक्षण संचालनालयाने दोन दिवस अगोदरच यादी जाहीर केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *