
मुंबई :
दहावीत ९० पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या ५६७ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमासाठी अर्ज केले आहेत. यामध्ये ९५ ते १०० टक्के गुण मिळवलेल्या २६ विद्यार्थ्यांची संख्या २६ इतकी आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात आयटीआयकडे वळण्याचा निर्णय घेतल्याचे यावरून स्पष्ट होते.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने १ लाख ७३ हजार ६७३ विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचे प्रवेश शासकीय व खासगी आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमामध्ये होणार आहेत. यादीनुसार ८० ते ९० टक्के गुण मिळवलेले ३ हजार २४५ विद्यार्थी, तर ७० ते ८० टक्के गुण गटातील विद्यार्थी ५१,९६७ इतके आहेत. ७० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्यांची संख्या सर्वाधिक असून यामध्येही स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे.
आयटीआयकडे आता ९०-१०० टक्के गुण मिळवणाऱ्यांचाही कल दिसत आहे. वाढती बेरोजगारी व पदवी शिक्षणाऐवजी तांत्रिक कौशल्यांवर भर देणारी धोरणे यामुळे हा बदल होत असल्याचं दिसून येते.
असे आहेत विद्यार्थी
- १०० ते ९५ – २६
- ९५ ते ९० – ५४१
- ९० ते ८५ – ३,२४५
- ८५ ते ८० – ८,१७४
- ८० ते ७५ – १३,८४५
- ७५ ते ७० – १९,२३४
- ७० ते ६५ – २३,५५९
- ६५ ते ६० – २५,१६२
- ६० ते ५५ – २४,५९४
- ५५ ते ५० – २१,६६२
- ५० ते ४५ – १७,११०
- ४५ ते ४० – ११,४७९
- ४० पेक्षा कमी – ५,०४२
एकूण विद्यार्थी – १,७३,६७३