
डोंबिवली (शंकर जाधव) :
आषाढी एकादशी निमित्त डोंबिवलीजवळील भोपर गावात धर्मा चॅरीटेबल ट्रस्ट आणि जे. के. पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज जणू काही प्रति पंढरपूर बनल्याचे दिसले. या शाळेतील विद्यार्थी श्री विठ्ठल, विद्यार्थीनी रखुमाई आणि वारकरी बनल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी टाळ – मृदूंगाच्या गजरात विठूरायाचे नावं घेत होते. भोपर गावातील गावकरीही यावेळी दर्शनाकरता आले होते. जे. के. पाटील इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज संचालक गजाजन पाटील, मुख्याध्यापिका मंजुळा पाटील, माजी सरपंच काळू बुवा मढवी, वामनबाबा आश्रमातील सेवेकरी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणाऱ्या आनंदाचे छायाचित्रण गावकऱ्यांनी केले. संत ज्ञानेश्वर, तुकराम, मुक्ताबाई, बहिणाबाई, जनाबाई, नामदेव इत्यादी संत झालेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईलने फोटो काढण्यास गावकऱ्यांनी गर्दी केली होती. यावेळी शाळेचे संस्थापक गजाजन पाटील म्हणाले,वारकरी संप्रदायाशी जरी मी निगडीत असलो तरी आजवर कधीही वारीला गेलो नाही.मला पंढरपूरला जाण्याची खप इच्छा आहे. विठुराया माझी इच्छा लवकरच पुर्ण करील.माझी शाळा हेच माझे पंढरपूर आणि माझे विद्यार्थी हेच माझे विठ्ठल रखुमाई आहेत. शाळेत भजन, कीर्तनमय वातावारणात विद्यार्थी वारकरी बनले होते.