शहर

Pradeep Nannaware : फुटपाथवर वाढणाऱ्या चिमुरडीसाठी ‘देवदूत’ ठरले प्रदिप नन्नवरे 

मुलं रेल्वे स्टेशन परिसरात व फुटपाथवर वाढायला नकोत, त्यांचं आयुष्य चांगलं असावं हीच इच्छा," असं साध्या शब्दात प्रदिप नन्नवरे सांगतात.

मुंबई (उमेश मोहिते)

रंजल्या-गांजल्यांच्या मदतीला धावून जातात प्रदीप नन्नवरे, संवेदनशील मनाचा युवक प्रदीप नन्नवरे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अशा माणसांत देव शोधण्याचा छंद जोपासणारा हा आधुनिक देवदूत ठरला आहे. ७ वर्षांपूर्वी या मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर वडिल मोलमजुरी करत असून रेल्वे स्टेशन व फुटपाथवर राहून मुलीचे पालनपोषण करीत होते. मात्र, रेल्वे स्टेशनच्या हद्दीत मुलगी सुरक्षित नव्हती. त्याचवेळी मुलीच्या भविष्याचा विचार करून, युवा समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांनी पुढाकार घेऊन त्या मुलीला महिला व बाल विकास भवन परभणी येथे दाखल केले.

पूर्णा येथील अतिश गायकवाड व नगर परिषदेचे कर्मचारी साई दुधे व सतीश अलगे यांना ही मुलगी पुर्णा रेल्वे स्टेशन परिसरात दिसली असता त्यांनी या मुलीच्या वडिलांना विचारले. तुम्ही १५ दिवसापासून इथेच दिसत आहेत नेमकी काय अडचण आहे? आपल्याला तेंव्हा त्यांनी सांगितले आम्ही पुणे येथून काम बंद झालं म्हणून या ठिकाणी आलो आहोत. परभणी येथे मी काम करतो. पण परभणी येथील रेल्वे पोलीस स्टेशन परिसरात राहू देत नाहीत म्हणून पुर्णा येथे आलो. माझी मुलगी पण सोबत असते तिला हॉस्टेल मध्ये टाकण्यासाठी मदत करा. तेव्हा नगर परिषदेचे कर्मचारी साई दुधे व अतिश गायकवाड यांनी प्रदिप नन्नवरे यांना फोन करून सर्व घटना सांगितली. असता प्रदिप नन्नवरे तातडीने त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती घेऊन महिला व बाल विकास भवन परभणीचे अधिकारी रवींद्र कातनेश्वरकर यांना कॉल करून सर्व घटना सांगितली. असता त्यांनी तत्काळ संबंधित १०९८ नंबर देऊन त्यांच्या एका महिला कर्मचाऱ्यांरी यांचा मोबाईल नंबर दिला. त्या मुलीला परभणी येथे घेऊन या म्हणाले,असता प्रदिप नन्नवरे यांनी ताबडतोब मुलीला आणि तिच्या वडिलांना महिला व बाल विकास भवन, परभणी येथे सुरक्षितपणे सोडून आले. जिथे तिला योग्य शिक्षण आणि संरक्षण मिळू शकेल. या उपक्रमामुळे मुलीला नवीन जीवनाची संधी मिळाली आहे. प्रदिप नन्नवरे यांच्या या सहृदयतेमुळे त्या मुलीला आश्रय आणि सुरक्षित भविष्याची हमी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. युवा समाजसेवक प्रदिप नन्नवरे यांच्या या कार्यामुळे त्यांचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायक ठरला आहे.
यावेळी सहकारी श्रीकांत हिवाळे, अमित गायकवाड, राजकुमार वाव्हुळे, सुनील कांबळे, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *