शहर

Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाड यांनी महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात डोंबिवलीत मनसेचे आंदोलन

डोंबिवली (शंकर जाधव) :

दोन दिवसापूर्वी शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणारे महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.त्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला गाढवाचा फोटो लावून त्यांच्या प्रतिमेला महिला सेना कार्यकर्त्यांनी जोडे मारले.

थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्या या आमदाराच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली. आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहराध्यक्ष राहुल कामत, महिला शहराध्यक्षा मंदा पाटील, विधानसभा अध्यक्ष उदय वेळासकर, अरुण जांभळे, शहर सचिव संदीप (रमा )म्हात्रे, शहर संघटक सुमेधा थत्ते, स्मिता भणगे, प्रतिभा पाटील,उपशहराध्यक्ष प्रेम पाटील, निशांत पाटील, श्रीकांत वारंगे, विभाग अध्यक्ष रवी गरुड, प्रदीप चौधरी, विशाल बढे, रतिकेश गवळी, हिम्मत मात्रे, निलिमा भोईर, परेश भोईर, तसेच शाखाध्यक्ष उपविभाग अध्यक्ष महिला सेना आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *